मित्राच्या प्रेमाच्या प्रस्तावासाठी प्राध्यापकाकडून तरुणीला शिवीगाळ करून धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 13:38 IST2018-10-18T13:37:12+5:302018-10-18T13:38:05+5:30

चाळीसवर्षीय प्राध्यापकाकडून मित्राच्या प्रेमाच्या प्रस्तावासाठी दोन बहिणींना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

Professor threatens a woman for a friend's love proposal | मित्राच्या प्रेमाच्या प्रस्तावासाठी प्राध्यापकाकडून तरुणीला शिवीगाळ करून धमकी

मित्राच्या प्रेमाच्या प्रस्तावासाठी प्राध्यापकाकडून तरुणीला शिवीगाळ करून धमकी

औरंगाबाद : चाळीसवर्षीय प्राध्यापकाकडून मित्राच्या प्रेमाच्या प्रस्तावासाठी दोन बहिणींना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून उस्मानपुऱ्यातील केमिस्ट्री क्लासेसचा प्राध्यापक व मालक कल्याण चक्रवर्ती व राहुल लोळगे (रा. उल्कानगरी, उस्मानपुरा) यांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राहुल लोळगे हा तक्रारदार तरुणीच्या बहिणीचा मागील अनेक दिवसांपासून पाठलाग करीत आहे. १४ आॅक्टोबर रोजी राहुल व कल्याणने राहुलच्या मोबाईलवरून कॉल करून शिवीगाळ केली. तसेच अरेरावी करीत सतत कॉल करून त्रास दिला. कल्याणने सुद्धा कॉलवर तिला धमकी देत राहुलला होकार नाही कळवला, तर तुझ्या बहिणीला व भावजयीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. जवाहरनगर पोलिसांनी या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करीत आहे.
 

Web Title: Professor threatens a woman for a friend's love proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.