शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

औरंगाबादेतील कचरा संकलनाचे खासगीकरण ; २११ कोटींचा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 9:50 PM

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक नागरिकाकडून कचरा जमा करणे, हा कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत नेऊन टाकणे या कामासाठी सोमवारी स्थायी समितीने ...

ठळक मुद्देस्थायी समिती : नागरिकांना १ रुपया, व्यावसायिकांना २ रुपये उपभोक्ता कर

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक नागरिकाकडून कचरा जमा करणे, हा कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत नेऊन टाकणे या कामासाठी सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. २११ कोटी रुपयांचा हा प्रकल्प ७ वर्षे राबविण्यात येणार आहे. बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला काम देण्यात आले आहे. मागील एक महिन्यापासून स्थायी समितीमध्ये हा विषय रेंगाळला होता. जडअंत:करणाने समिती सदस्यांनी सोमवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली.शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. एक मेट्रिक टन कचरा कंपनीने कचरा प्रक्रिया केंद्रावर नेऊन टाकल्यास मनपा १८६३ रुपये कंपनीला देणार आहे. दररोज ८ लाख ३८ हजार रुपये, महिना २ कोटी ५१ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. कंपनीला वर्कआॅर्डर लवकरच देण्यात येणार आहे. कंपनीचे काम सुरू होताच नागरिकांना दररोज एक रुपया उपभोक्ता कर द्यावा लागेल. व्यापाऱ्यांना दररोज २ रुपये कर द्यावा लागेल. ही रक्कम मनपा जमा करणार किंवा कंपनी हे अद्याप निश्चित झालेले नाही. कंपनीला रिक्षा, टिप्पर, हुकलोडर, कॉम्पॅक्टर आदी सर्व यंत्रसामग्री नवीन आणि स्वत:च्या नावावर असलेली आणावी लागेल. भाड्याने जुनी यंत्रसामगी अजिबात चालणार नाही, अशी अटही टाकण्यात आली आहे.सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यावर नगरसेविका राखी देसरडा यांनी विशिष्ट कंपनीला काम मिळावे म्हणून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. सभापतींनी या मागणीकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सर्व सदस्यांची नाराजी यापूर्वीच दूर करण्यात आली होती. जडअंत:करणाने सदस्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.१३०० मजूर सफाईसाठीघनकचरा विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी खुलासा करताना सांगितले की, कचरा संकलन व वाहतुकीचे काम पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिल्यानंतर मनपाच्या आस्थापनेवरील १२९५ सफाई मजुरांना स्वच्छतेची कामे देण्यात येणार आहेत. सध्या भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली खासगी वाहने, कंत्राटी मनुष्यबळ यांना कामावरून काढून टाकले जाईल, असे त्यांनी नमूद केले. आज बचत गटांचे ६८०, तर कंत्राटी २०० कर्मचारी कचºयाच्या कामासाठी नियुक्त केले आहेत. २५६ वाहने भाडेतत्त्वावर सुरू आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न