शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

औरंगाबादेत कामगारांची वाहतूक करणाऱ्या धावत्या खाजगी बसला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 3:01 AM

मिळालेल्या माहितीनुसार बसचालक कुरेशी हे शनिवारी रात्री 1 वाजता शेंद्रा एमआयडीसी तील पर्किन्स कंपनीच्या दुसऱ्या पाळीच्या कामगारांना घेऊन शहरात आले. बस सिडको एन 2 मधील महालक्ष्मी चौकातून जयभावणींनागरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येताच बसच्या इंजिनामधून धूर निघू लागला.

बापू सोळुंके -औरंगाबाद : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पार्किन्स कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱ्या धावत्या खाजगी बसला शनिवारी रात्री 1:20 वाजता  आग लागली. ही घटना सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते जयभावनिनागर रस्त्यावर झाली. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवून कामगारांना बसमधून उत्तरावल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत अवघ्या काही मिनिटात आगीने बस कवेत घेतली. आगीच्या माहितीनंतर फायरब्रिगेडच्या जवानानी घटनास्थळी येऊन आग विझवली मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून कोळसा झाली आणि बसचा सांगडाच राहिला. (private bus carrying workers caught fire In Aurangabad)

मिळालेल्या माहितीनुसार बसचालक कुरेशी हे शनिवारी रात्री 1 वाजता शेंद्रा एमआयडीसी तील पर्किन्स कंपनीच्या दुसऱ्या पाळीच्या कामगारांना घेऊन शहरात आले. बस सिडको एन 2 मधील महालक्ष्मी चौकातून जयभावणींनागरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येताच बसच्या इंजिनामधून धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बस उभी केली आणि कामगारांना बसमधून उतरवले आणि स्वतःही बाहेर पडला.  यानंतर त्यांनी माती टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर काहींनी फायरब्रिगेडला कॉल केला . तेव्हा चिकलठाणा एमआयडीसीमधून एक बंब तेथे दाखल झाला तोपर्यंत आगिने  संपूर्ण बसला वेढा दिला होता. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर आणि कर्मचारी यांनी शेजारील रुग्णालयातून पाणी मिळवून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

 

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबादFire Brigadeअग्निशमन दलCrime Newsगुन्हेगारी