पोलिसांच्या हाताला झटका देऊन कैद्याचे हातकडीसह पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:17 IST2020-06-19T12:22:05+5:302020-06-19T15:17:38+5:30
खुनाच्या गुन्ह्यात होता अटकेत

पोलिसांच्या हाताला झटका देऊन कैद्याचे हातकडीसह पलायन
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या कैद्याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५.५० घडली .इमरान बेग आमेर बेग (२५ , रा . काबरानगर गारखेडा ) असे फरार कैद्यांचे नाव आहे . याविषयी बेगमपुरा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
१६ मार्च रोजी रात्री संग्रामनगर रेल्वे रुळाजवळ अक्षय प्रधान याचा आरोपी इमरान आणि सोहेल शेख यांनी धारदार शस्त्राने खून केला होता . या गुंह्यात १७ मार्च रोजी गुन्हेशाखेने आरोपीला अटक केली होती . तेव्हापासून ते जेलमध्ये होते. गुरुवारी रात्री दुखत असल्याने १२ वाजेच्या दरम्यान घाटीत उपचारासाठी इमरानला दाखल केले होते. वार्ड क्र. १३ मध्ये उपचार घेत असताना शुक्रवारी पहाटे त्याने तेथून धूम ठोकली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.