शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार उस्मानाबादेत

By admin | Updated: August 6, 2014 02:30 IST

उस्मानाबाद : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. यातील येडशी ते औरंगाबाद या कामाच्या शुभारंभासाठी येत्या १९ ते २२ आॅगस्ट या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उस्मानाबाद येथे येणार असल्याचा तातडीचा मेल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, याअनुषंगाने प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरु झाली आहे.सोलापूर-धुळे या उस्मानाबादहून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. यामध्ये सोलापूर ते येडशी, येडशी ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते धुळे असे तीन टप्पे आहेत. यातील येडशी ते औरंगाबाद या टप्प्याच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १९ ते २२ आॅगस्ट या कालावधीत करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांनी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी चौपदरीकरणासाठीच्या ८० टक्के जमिनीचे नाहरकत प्रमाणपत्र आयआरबी या कंपनीला हस्तांतरीत करण्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगत, या चौपदरीकरणासाठी ज्या तीन गावातील शेतजमीन गेली आहे तेथील भू-संपादनाचा मावेजा प्राधिकरणाने बँकेत जमा केला असल्याचे नमूद करीत, प्राधिकरणाने मावेजाचे चार अ‍ॅवॉर्ड तयार केले आहेत. पीआययु औरंगाबाद यांची केवळ स्वाक्षरी बाकी असल्याचे सांगत, इतर दहा गावांच्या जमिनीचे अ‍ॅवॉर्डही तात्काळ जारी करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या औरंगाबाद विभागाच्या प्रकल्प विभागाच्या संचालकांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, सदर संदेश प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीला प्रारंभ केला आहे.