शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर चालविला हातोडा, नंतर दिले भोगवटा प्रमाणपत्र

By admin | Updated: January 23, 2015 00:57 IST

औरंगाबाद : अवैध बांधकाम ठरवून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दीड-दोन वर्षांपूर्वी चिकलठाणा येथील गट क्रमांक ४०८ मधील ज्या बहुचर्चित पोल्ट्री फॉर्मवर हातोडा चालविला होता,

औरंगाबाद : अवैध बांधकाम ठरवून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दीड-दोन वर्षांपूर्वी चिकलठाणा येथील गट क्रमांक ४०८ मधील ज्या बहुचर्चित पोल्ट्री फॉर्मवर हातोडा चालविला होता, त्याच बांधकामाला नियमानुकूल करीत नगररचना विभागाने भोगवटा प्रमाणपत्र बहाल केल्याचे गुरुवारी स्थायी समितीसमोर उघड झाले आणि पालिकेचे वातावरण पुन्हा तापले. पालिकेचे उपायुक्त व प्रशासन अधिकारी शिवाजी झनझन यांना तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती विजय वाघचौरे यांनी दिले. नगरसेवक संजय चौधरी यांनी गुरुवारी पुन्हा योगेश विठ्ठलभाई जव्हेरी यांच्या पोल्ट्री फार्मचा मुद्दा उपस्थित केला. ज्या बांधकामाला पालिकेने अनधिकृत ठरवून पाडले होते, त्या पोल्ट्री फार्मला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले काय, ते देण्याची पद्धत, नियम काय, अपूर्ण बांधकामाला संपूर्ण भोगवटा दिले जाते काय, आदी प्रश्न विचारताना चौधरी यांनी नगररचना विभागाचे अधिकारी आर. एन. संधा यांना अपशब्दही काढले. चौधरी यांचे ते शब्द सभापतींनी नंतर कामकाजातून वगळले. संधा यांनी सांगितले की, पुण्याच्या नगररचना संचालकांच्या पत्रावरून सदर पोल्ट्री फार्मला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. संधा यांच्या या खुलाशावर नगरसेवक काशीनाथ कोकाटे, त्र्यंबक तुपे, मीर हिदायत अली, अज्जूभाई आदी सर्वच संतापले व त्यांनी अनेक प्रश्न विचारून संधा यांना घाम फोडला. नियमानुसार परवानगी घेऊन बांधकाम पूर्ण झालेले अनेक मालमत्ताधारक भोगवटासाठी पालिकेत चकरा मारून त्रस्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला अधिकारी काही विशिष्टप्रकरणी विशेष लक्ष देऊन ते काम करतात कसे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सर्वच नगरसेवकांनी लावून धरली.