शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

अल्पवयीन मुलीच्या पर्समध्ये आढळली प्रेगन्सी किट; आईने विचारताच सांगितली धक्कादायक आपबिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 12:57 IST

तुमची मुलगी काय करते ? सतर्क आईमुळे फुटली १५ वर्षांच्या मुलीवरील अत्याचारास वाचा 

वाळूज महानगर : बजाजनगर परिसरातील आईने सहजच आपल्या १५ वर्षीय मुलीची पर्स तपासली व त्यात गर्भनिरोधक औषधी व प्रेग्नसी किट पाहून तिला धक्काच बसला. विश्वासात घेत मुलीला बोलते केले तेव्हा तिच्यावर कधी प्रेमाआडून, तर कधी दहशतीने मागील दोन महिन्यापासून सतत शारीरिक आघात केले जात ( Rape on minor girl in Aurangabad ) असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

आईने मुलीला सोबत घेत पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अरविंद सदावर्ते (रा. दाभा, पो. इटोली, ता. जिंतुर, जि. परभणी, ह.मु. बजाजनगर) यास गावाहून अटक करून आणले. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

रेश्मा (१५, नाव काल्पनिक) ही आई व सावत्र वडिलांसोबत बजाजनगरात राहते. ती बजाजनगर परिसरात शिवण क्लासचे प्रशिक्षण घेते. दोन महिन्यापूर्वी रेश्मा शिवण क्लासला जात असताना रस्त्यात तिची मोपेड बंद पडली. रस्त्याने जाणाऱ्या अरविंद सदावर्तेकडे तिने मदत मागितली. त्याने प्रयत्न करूनही मोपेड दुरुस्त होत नसल्याने अरविंदने तिच्याकडून आईचा मोबाइल नंबर घेतला व त्यांना मोपेड बंद पडल्याची माहिती दिली. रेश्माचा मोबाइलनंबर अरविंदकडे आल्याने त्याने सतत तिच्याशी गप्पा मारून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

गर्भनिरोधक औषधी व प्रेगन्सी किटमुळे प्रकार उघडकीस१५ दिवसांपूर्वी रेश्माच्या आईने तिची पर्स तपासली असता त्यात गर्भनिरोधक गोळ्या व प्रेगन्सी किट आढळले. आईने तिची विचारपूस केली असता अरविंदशी प्रेमसंबंध व शारीरिक संबंध आल्याचे तिने सांगितले.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचाररेश्माला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर अरविंदने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रसंगाचे अरविंदने गुपचूप मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले. तिला व्हिडिओ क्लिप दाखवून अरविंद तिला रूमवर नेऊन अत्याचार करू लागला. तिने नकार दिला तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आपले ईप्सित साध्य करू लागला होता. प्रकार उघडकीस आल्यावर रेश्माचे आई-वडील व मित्रमंडळीनी अरविंदच्या घरी जाऊन त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. या मोबाइलमध्ये ती अश्लील क्लिप सापडली. अरविंदने गयावया करून तो रेश्मासोबत लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर तो गावी गेला तो परत येईचना. 

आरोपीला तीन दिवसाची कोठडीआई-वडिलांना आणण्यासाठी गावी गेलेला अरविंद परत येत नसल्याने तिच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आरोपी अरविंद सदावर्तेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास शुक्रवारपर्यंत (दि. ३१) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप गुरमे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद