शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम बांधवांची पावसासाठी साश्रू नयनाने प्रार्थना

By admin | Updated: July 7, 2014 00:20 IST

नांदेड: पावसाने पाठ फिरविल्याने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले आहे़ पाऊस पडण्यासाठी सर्वत्र ईश्वराची आराधना करण्यात येत आहे़

नांदेड: पावसाने पाठ फिरविल्याने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले आहे़ पाऊस पडण्यासाठी सर्वत्र ईश्वराची आराधना करण्यात येत आहे़ या पार्श्वभूमीवर रविवारी देगलूरनाका परिसरातील मुस्लिम बांधवांनी साश्रू नयनाने पाऊस पडण्यासाठी नमाज अदा करून ईश्वराला साकडे घातले़ मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत़ त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे़ पावसाची प्रतीक्षा करण्यात दीड महिना उलटला़ मात्र अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ दुष्काळ तोंडावर आहे, त्यामुळे माणसे ईश्वराची धावा करत आहेत़ देगलूरनाका भागातील ईदगाव मैदानावर रविवारी सकाळी दहा वाजता सहा हजार मुस्लिम बांधवांनी एकत्र येवून ईश्वराजवळ आपल्या गुन्ह्यांची कबुली देत व माफी मागत पाऊस पाडण्याची विनंती केली़ यावेळी लहान मुले व प्राण्यांनाही सोबत घेतले होते़ यासंदर्भात माहिती देत मौलाना सरवर म्हणाले, पृथ्वीवर जेव्हा पाप वाढते, तेव्हा अशी परिस्थिती उदभवते़ त्यासाठी ईश्वराजवळ आपल्या गुन्ह्यांची कबुली व माफी मागणे आवश्यक असते़ यावेळी निष्पाप मुले तसेच मुक्या प्राण्यांना सोबत घेण्यात येते़ या प्रार्थनेत, हे ईश्वरा तुझ्यापुढे आम्ही खुप दुबळे असून तुच आमचा पाठीराखा आहेस़ आम्ही आमच्या गुन्ह्यांची कबुली देत असून तु आम्हाला माफ कऱ निदान आमच्या लहान मुले तसेच मुक्या प्राण्यांवर तुझी कृपादृष्टी कऱ पाऊस पडत नसल्यामुळे आम्ही सर्व निराश झालो आहेत़ आता तरी पाऊस पाड, अशी याचना करण्यात येते़ सफा बैतूलमान या सामाजिक संघटनेच्या वतीने या प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते़ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रमजान या पवित्र महिन्यात संघटनेच्या वतीने गोरगरीबांना राशन, कपडे देण्यात आल्याचेही मौलाना सरवर यांनी सांगितले़ नमाज अदा करताना मौलाना अलीमोद्दीन, महंमद सरवर खासमी यांनी माहिती दिली़ (प्रतिनिधी)