शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम, या आहेत प्रमुख मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 18:44 IST

"आम्ही पक्षाच्या वतीने, या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमि येथून सुरूवात करायची. त्याच दिवशी पुण्यात फुलेवाड्याला जायचे आणि २६ तारखेला सकाळी, २६ जूलै एक महत्वाची तारीख आहे. याच दिवशी शाहू माहाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन 'आरक्षण बचाव जनयात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे."

वचित बहुजन आघाडी जी भूमिका मांडत आहे ती, गावो गावी जायला हवी, अशी काही ओबीसी संघटनांची मागणी होती. त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने, या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमि येथून सुरूवात करायची. त्याच दिवशी पुण्यात फुलेवाड्याला जायचे आणि २६ तारखेला सकाळी, २६ जूलै एक महत्वाची तारीख आहे. याच दिवशी शाहू माहाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन 'आरक्षण बचाव जनयात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, जालना अशी होत सांगता सात अथवा आठ तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांसोबत बोलत होते. 

अशा आहेत मुख्य मागण्या -आंबेडकर म्हणाले, "या मार्गावर ठीक-ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील. यातील मुख्य मागण्या म्हणजे, ओबीसींचे आरक्षण वाचायला हवे, एससी-एसटी विद्यार्थांची स्कॉलरशिप दुप्पट व्हावी, केवळ केंद्राचीच स्कॉलरशिप मिळते इतर राज्यांप्रमाणे त्यात राज्य हिस्सा देत नाही. याच बरोबर, ओबीसींच्या विद्यार्थ्यांनादेखील एससी एसटीला जी स्कॉलरशिप मिळते ती जशीच्या तशी लागू व्हायरला हवी, घाई गडबडीत इश्यू करण्यात आलेला फॉर्म ऑफ कास्ट सर्टेफिकेट रद्द करावा, जे कुणबी  आहेत, त्यांना आरक्षण मिळणारच, कारण ते ओबीसीमध्ये सामील आहे. तसेच, आरक्षणात एससी, एसटी बरोबरच ओबीसींनादेखील बदोन्नती मिळायला हवी," असेही आंबेडकर म्हणाले.

राजकीय पक्षांच्या भूमिकेसंदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले, "एकीकडे मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे, तर दुसऱ्याबाजूला जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते, एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांनी नेमकी भूमिका काय? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. यावर सामंजस्याचा तोडगा काढायचा असेल, तर येथील श्रीमंत माराठ्यांचे पक्ष जे आहेत, यात एनसीपी, काँग्रेस, बाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, हे जोवर भूमिका मांडत नाहीत. तोवर तोडगा निघत नाही."

"दुसऱ्या बाजूला त्याच बैटकीत वंचितकडून मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली होती की, मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत आणि मुख्यमंत्री म्हणूनही पत्र लिहावे की, जरांगे यांची मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, ही जी मागणी आहे, या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे? यासंदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काय आहे तो काढता येतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वंचितला अद्याप तेस काहीही पत्र मिळाले नाही. इतरांना मिळाले का यासंदर्भात आमच्याकडे माहिती नाही. हा मुद्दा आता केवळ मराठवाड्यापुरताच आहे, असे मी मानत नाही. तर तो पश्चिम महाराष्ट्र आणि खांदेशातही हळू-हळू पसरत चालला आहे," असेही आंबेडकर म्हणाले.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण