शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथा-पालथींची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 11:51 IST

‘युती होते की तुटते’ यावर पक्ष बदलण्याचा निर्णय

ठळक मुद्देसत्तार यांच्या सेनाप्रवेशानंतर वातावरण गरम 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघण्याच्या वाटेवर आहे. येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या उलथा-पालथीची शक्यता आहे. युती आणि आघाडीच्या गोळाबेरजेवरच सगळी राजकीय गणितं अवलंबून असून, येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चितच मोठे राजकीय आदान-प्रदान होणे शक्य आहे. काँग्रेसचे माजी आ. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय चर्चांचा बाजार गरम झाला आहे. कन्नड, फुलंब्री, गंगापूरमधून मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

फुलंब्रीचे काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सोशल मीडियातून होत आहे. कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्यासह आणखी एक काँग्रेसचे माजी आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तसेच कन्नडमधील एक-दोन नगरपालिका सदस्यांनीदेखील शिवसेनेशी संपर्क सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून भाजपचे किशनचंद तनवाणी यांचा शिवसेना प्रवेश सोशल मीडियाने घडवून आणला होता; परंतु प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. तनवाणी हे भाजपमध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या प्रवेशाच्या बातम्यांना ब्रेक लागला आहे. 

कल्याण काळे यांचे स्पष्टीकरण असेकृष्णा पा. डोणगावकरांनी महिनाभरापूर्वी मला विचारणा केली होती. काय चालले आहे, त्यांनी विचारले, मी त्यांना आमची तयारी सुरू असल्याचे सांगितले होते. उलट युती झाल्यावर डोणगावकर तुमचे काय होणार, असेही मी त्यांना त्यावेळी विचारले होते. कालपर्यंत भाजपच्या नावाने बुक केले होते, आता शिवसेनेच्या नावाने बुक केले जात आहे; परंतु मी आहे तेथेच आहे. शिवसेना-भाजप एकत्र लढल्यावर आमचा मतदारसंघ भाजपला जाणार आहे. मी भाजपत जाणार असे एखादा म्हटला असता तर मी समजू शकलो असतो. लोकसभेच्या वेळीही मी काँग्रेस सोडणार अशी राजकीय पुडी अंदाज बांधणाऱ्यांनी सोडली होती. या चर्चांना काहीही अर्थ नाही. 

हर्षवर्धन जाधव म्हणाले, मला ऑफरच नाहीकन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव म्हणाले, मला तर अजून कुठल्याही पक्षाची आॅफर नाही. कन्नड भाजपला सुटेल अशी चर्चा आहे. काहीपण होऊ शकते, कारण अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले. त्यामुळे सिल्लोड सेनेला आणि कन्नड भाजपला, अशी पण चर्चा आहे. बघू या काय होते ते, सध्या तरी शिवस्वराज्य बहुजन पक्षात आहे.  कुणाची ऑफर आली तर विचार करू. महाराष्ट्र सगळा एका बाजूने कलला आहे. भविष्यात मतदारसंघात विकासकामे करायची झाल्यास सरकार पाठीशी लागेल. त्यामुळे मतदारसंघाच्या दृष्टीने हिताचे निर्णय घ्यायचे झाल्यास घेऊ. मात्र, सध्या कुणाचीही आॅफर नाही आणि मी देखील कुणाशी संपर्क केलेला नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस