शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीची शाश्वती संपल्याने डाळी कडाडल्या

By admin | Updated: July 2, 2014 01:01 IST

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद जून महिना संपत आला; पण पावसाने दडी मारल्याने उडीद-मुगाची पेरणी झालीच नाही.

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबादजून महिना संपत आला; पण पावसाने दडी मारल्याने उडीद-मुगाची पेरणी झालीच नाही. पेरणीची शाश्वती न राहिल्याने बाजारपेठेत त्याचा त्वरित परिणाम दिसून आला. उडीद-मूग डाळीच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी भाव वधारले. करडी व शेंगदाणा तेलातील तेजीने फोडणी देणेही महागले. साखरेच्या भावातही चढ-उतार दिसून आला. एकंदरीत मागील आठवड्यात महागाईने सर्वसामान्यांना होरपाळून काढले.रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. लवकरच चातुर्मासाला आरंभ होणार आहे. तसेच आषाढी एकादशी आठवड्यावर येऊन ठेपली आहे. जुलै महिन्यापासून उपवास, व्रत, धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जाणार आहेत. दुसरीकडे जून महिना संपत आला तरीही मान्सून सक्रिय झाला नाही. परिणामी, उडीद व मुगाची ९९ टक्के पेरणी झालीच नाही. जिथे १ टक्का पेरणी झाली तिथे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. १० जुलैच्या आत मान्सून सक्रिय झाला तरीही उडीद व मुगाच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होणार नाही. कारण, येत्या १० दिवसांत पेरणी केली तरीही उत्पादनात घट होणार आहे. नजीकच्या भविष्यात डाळी बाजारपेठेत येण्याची शाश्वती नसल्याने बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी मागील वर्षीच्या शिल्लक डाळींचे भाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात ३०० रुपयांनी महागून मूग डाळ ७,८०० ते ८,४०० रुपये, उडीद डाळीत २०० रुपये वाढून ६,८०० ते ७,७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. याचा परिणाम अन्य डाळींवरही झाला. यातही २०० ते ३०० रुपये तेजी येऊन हरभरा डाळ ३,००० ते ३,६०० रुपये, तूर डाळ ५,८०० ते ६,२०० रुपये, मठ डाळ ७,५०० ते ७,७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली, अशी माहिती कमिशन एजंट प्रकाश जैन यांनी दिली.करडी, शेंगदाणा तेल आणखी महागलेएकीकडे करडी बीची आवक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. करडी पेंडचे भाव उतरले आहेत. परिणामी, करडी बी महागले. भुईमुगाचे उन्हाळी पीक कमी आले. दुसरीकडे रमजान महिना, चातुर्मास, आषाढी एकादशीने खाद्यतेलाला मागणी वाढल्याने याचा एकंदरीत परिणाम खाद्यतेलाच्या भाववाढीवर झाला आहे. करडी तेलाच्या भावात मागील १५ दिवसांत लिटरमागे १० रुपयांची वाढ होऊन साधे ९५ रुपये व डबल फिल्टर १०० रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. शेंगदाणा तेलाच्या भावातही ५ रुपयांनी वाढ होऊन साधे ९० रुपये, तर डबल फिल्टर ९५ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे, अशी माहिती खाद्यतेल विक्रेते जगन्नाथ बसैये यांनी दिली. गेल्यावर्षीच्या तुलनेत तांदूळ महागच मागील वर्षी तांदूळ कमीत कमी २,२०० ते ९,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विक्री झाला होता. यंदा बाजारात २,५०० ते १५,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत तांदूळ विकला जात आहे. ओरिजनल बासमती तांदळाचा भाव प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचल्याने बासमतीची विक्री नगन्य राहिली आहे.