शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये विद्यापीठ अभ्यास मंडळासाठी होणार शनिवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 20:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २० अभ्यास मंडळांसाठी शनिवारी (दि.१७) चार जिल्ह्यातील आठ केंद्रांवर मतदान होणार आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २० अभ्यास मंडळांसाठी शनिवारी (दि.१७) चार जिल्ह्यातील आठ केंद्रांवर मतदान होणार आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात तीन, जालना १, बीड २ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात २ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवडणूकीनंतर नामनिर्देशन करण्यावरून उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंचमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. विद्यापीठ प्रशासनाने रातोरात निवडणूकीपूर्वीच अभ्यासमंडळावर नियुक्त्या केल्या होत्या. याला उत्कर्षतर्फे आक्षेप  घेण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या २० अभ्यास मंडळांसाठी शनिवारी मतदान होत आहे. यात प्रत्येक अभ्यासमंडळात ३ सदस्य निवडूण येणार आहेत. तर पाच जणांनी नामनिर्देशन कुलगुरू डॉ. बी.ए . चोपडे यांनी केले आहे. विद्यापीठातील विभागप्रमुख अभ्यास मंडळाचे पदसिद्ध सदस्य असणार आहेत. एकुण ६० जागांसाठी १२८ उमेदवार रिणांगणात आहेत. उर्वरित अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. तसेच चार जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रावरील कर्मचारी शुक्रवारीच रवाना झाले आहेत. 

मतदारांना सुट्टी जाहीरअभ्यास मंडळाच्या निवडणूकीत महाविद्यालयातील विविध विषयांच्या विभागप्रमुखांनाच मतदान असते. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विभागप्रमुखांना शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी कुलगुरूंच्या आदेशाने काढले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादElectionनिवडणूक