शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

बाजार प्रकरणात राजकारणाचा वास; शिवसेनेत पडले दोन गट

By admin | Updated: July 23, 2014 00:42 IST

औरंगाबाद : शहागंज ते सिटीचौकपर्यंतच्या रस्त्यावर बाजार भरल्यामुळे शिवसेनेत त्यावरून दोन गट पडले आहेत. या सगळ्या प्रकारामागे राजकारणाचा वास येऊ लागला आहे.

औरंगाबाद : शहागंज ते सिटीचौकपर्यंतच्या रस्त्यावर बाजार भरल्यामुळे शिवसेनेत त्यावरून दोन गट पडले आहेत. या सगळ्या प्रकारामागे राजकारणाचा वास येऊ लागला आहे. माजी आ. किशनचंद तनवाणी व त्यांच्या समर्थकांनी त्या बाजार प्रकरणात मनपा, पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. आ. प्रदीप जैस्वाल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्यामुळे दिवसभर व्यापाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. आ.जैस्वाल व त्यांचे समर्थक या प्रकरणात कुठेही दिसले नाहीत. रस्त्यांत बाजार भरविण्यासाठी पोलिसांवर कोणत्या नेत्याने दबाव आणला. यावरूनही व्यापाऱ्यांमध्ये चर्चेचे पेव फुटले होते. विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना रस्त्यावरील बाजारावरून सेनेतील गटबाजीचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे.तीन दिवसांपासून धावणी मोहल्ल्यातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात व्यापाऱ्यांच्या बैठकाही झाल्या. गेल्या आठवड्यापासून मनपा, पोलिसांकडे निवेदन देऊनही व्यापाऱ्यांची व त्या परिसरातील नागरिकांची व्यथा कुणीही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे शेवटी वैतागून सराफा व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. बाजार दरवर्षी भरतो. मात्र, यावर्षी बाजारातील विके्रत्यांची व हातगाड्यांची संख्या दुप्पट झाली. मध्य मतदारसंघामध्ये शिवसेनेतील दोन गटांपैकी एका गटाने व्यापारी, वाहतुकीची कोंडी समोर आणून दुसऱ्या गटाची कोंडी केली. तर रिपब्लिकन सेनेने मनपाच्या अधिकाऱ्यांवर व पोलिसांना अरेरावी करून बाजारातील विके्रत्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडींवरून शहागंजच्या रस्त्यावरील बाजारावरून मोठे राजकारण होणार असल्याचे दिसते. अशीही दिशाभूल...शहागंज रस्त्यावरील बाजार पारंपरिक असल्याचे पोलीस आयुक्तांना सांगण्यात आल्यामुळे त्यांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. दरवर्षी मीना बाजार भरत असे. मागील सात वर्षांपासून तो बाजार भरणे बंद झाले. त्यानंतर सिटीचौक परिसरातील फुटपाथवरच चार दिवसांसाठी तो बाजार भरण्याचा प्रघात पडला.यावर्षी मात्र, सिटीचौक पोलीस ठाण्यापर्यंत दोन्ही बाजूंनी आणि मध्यभागी आठवड्यापूर्वीच बाजार भरल्यामुळे नागरिकांची व त्या भागातील व्यापाऱ्यांची कोंडी झाली. स्कूल बस येणे बंद झाले, गर्दीमुळे महिलांना लांबून जावे लागते आहे. बाजार भरण्यास व्यापाऱ्यांचा विरोध नाही. मात्र, सार्वजनिक रस्त्यावरच बाजार भरणे हे कुणाच्याही हिताचे नाही, असे नगरसेवक सिद्ध म्हणाले.