शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांनी यावे; मात्र साहित्यिकांची आब राखूनच

By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : साहित्यिक मंचांवर राजकीय वावर असण्यात काही गैर नाही. साहित्यिकांनी राजकारण्यांना अस्पृश्य मानू नये. मात्र, त्यांचे लांगुलचालन करणेही योग्य नाही.

औरंगाबाद : साहित्यिक मंचांवर राजकीय वावर असण्यात काही गैर नाही. साहित्यिकांनी राजकारण्यांना अस्पृश्य मानू नये. मात्र, त्यांचे लांगुलचालन करणेही योग्य नाही. कारण संमेलनाध्यक्ष हीच संमेलनातील सर्वाधिक सन्माननीय व्यक्ती असते, असे मत ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले. बुधवारी शहरात आल्यावर त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. प्रशासनातील उच्चपदांवर काम करून निवृत्त झालेले देशमुख लेखन क्षेत्रातही दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी कथा, कविता, कादंबरी व स्तंभलेखनाच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासून समारोपापर्यंत राजकारण्यांचा वावर नेहमीच चर्चेत असतो. याबाबत देशमुख म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना नेहमीच राजकारण्यांची बरी-वाईट रूपे मी अनुभवलीत. समाजव्यवस्था चालविण्यासाठी प्रशासन व राजकारण या दोन बाबींना पर्याय नाही. साहित्यसुद्धा समाजाचेच प्रतिरूप असते. त्यामुळे राजकारण्यांवर फुली मारणे चुकीचेच आहे. साहित्य संमेलने झाली पाहिजेत या मताचा मी आहे. कारण त्या निमित्ताने वर्षभर लेखकांचा वाचकांशी संवाद होत राहतो. मात्र, संमेलनातील सवंग, उत्सवी बाबी वगळल्या पाहिजेत. मुन्शी प्रेमचंद यांनी प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन स्थापन केली होती. मराठीत अशी संघटना स्थापन करण्यास साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच इंग्रजी शाळा बंदच कराव्यात, असे वक्तव्य केले. त्याबाबत देशमुख म्हणाले की, इंग्रजी शाळा बंद करण्याऐवजी त्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करणे हा मध्यममार्ग असू शकतो. कारण आज इंग्रजी ही जगातच काय; देशातही ज्ञानभाषा बनली आहे, हे वास्तव आपण मान्य केले पाहिजे.