शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी थंडीत गुलमंडीवर राजकीय घडामोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:43 IST

खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांच्या गुलमंडीवरील पराभवाला कारणीभूत ठरलेले तत्कालीन युवा सेनेचे शहरप्रमुख मिथुन व्यास यांना पुन्हा युवा सेनेत प्रवेश दिला आहे. हा प्रवेश देताना जिल्हा युवाधिकारी ऋषिकेश खैरे यांनी पराभूत झालेल्या चुलतभावालाच विश्वासात घेतले नसल्याचे समोर आल्यामुळे खासदारपुत्र-पुतण्यातील मतभेद उघड झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गुलाबी थंडीचा जोर वाढत असताना गुलमंडीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांच्या गुलमंडीवरील पराभवाला कारणीभूत ठरलेले तत्कालीन युवा सेनेचे शहरप्रमुख मिथुन व्यास यांना पुन्हा युवा सेनेत प्रवेश दिला आहे. हा प्रवेश देताना जिल्हा युवाधिकारी ऋषिकेश खैरे यांनी पराभूत झालेल्या चुलतभावालाच विश्वासात घेतले नसल्याचे समोर आल्यामुळे खासदारपुत्र-पुतण्यातील मतभेद उघड झाले आहेत.मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या गुलमंडीवर स्थापन झाली होती. शिवसेना व गुलमंडी हे अतुट नाते बनलेले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून गुलमंडीने साथ दिल्यामुळे हा शिवसेनेचा गड मानला जातो. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजपची युती असताना शिवसेनेतर्फे खा. खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना उमेदवारी देण्यात आली. याच वेळी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर शिवसेनेत असलेले पप्पू व्यास यांनी बंडखोरी करून सचिन खैरे यांना आव्हान दिले होते. ही निवडणूक खैरे कुटुंबासाठी प्रतिष्ठेचा विषय बनली होती. पप्पू व्यास यांच्या कुटुंबातीलच सदस्य असलेले तत्कालीन युवा सेनेचे शहर युवाधिकारी मिथुन व्यास यांनी भावाला साथ दिली. याचा परिणाम सचिन खैरे व पप्पू व्यास यांच्यामध्ये शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली. यात अपक्ष राजू तनवाणी यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली. या निवडणुकीचा निकाल लागताच खैरे आणि व्यास कुटुंबामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. तेव्हापासून व्यास कुटुंब राजकारणापासून अलिप्तच राहिले. मात्र मिथुन व्यास यांच्यायुवा सेनेतील प्रवेशास पुन्हा राजकारणाला नव्याने सुुरुवात झाली आहे.मिथुन हे खा. खैरे यांचे पुत्र ऋषिकेश यांचे मित्र आहेत. दांडियापासून मिथुन व्यास हे ऋषिकेश यांच्यासोबत फिरत होते. यात रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौ-यानिमित्त जुन्या शिवसैनिकांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासाठी जोरदार हालचाली करण्यात आल्या. मात्र यात चुलतभावाचा पराभव करणाºया मिथुन व्यास यांनाच ऋषिकेश खैरे यांनी युवा सेनेत प्रवेश दिला. या प्रवेशामुळे दोन्ही नगरसेवक चुलतभावांमध्ये मतभेद असल्याचे चित्र समोर आले आहे.