शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

मास्क लावण्यावरून मनपा पथकाला राजकीय कार्यकर्त्यांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 1:31 PM

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी (माजी सैनिक) विनामास्क, सॅनिटायझर, थर्मल गन अथवा ऑक्सिमीटर नसल्याचे कारण पुढे करत दुकानदारांवर रोज दंडात्मक कारवाई करतात.

ठळक मुद्देमनपा प्रशासकांच्या वाहनातून सोमवारी सायंकाळी ६ वाजता एक पथक गुलमंडी आले. संतापलेले व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी पथकाला चांगलीच मारहाण केली.

औरंगाबाद : विनामास्क विद्यार्थ्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या पथकाला समजावून सांगणाऱ्या कार्यकर्त्यास अरेरावीची भाषा करणाऱ्या पथकाला कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी गुलमंडी परिसरात घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. मनपाचे कंत्राटी कर्मचारी मनमानी पध्दतीने व्यापारी आणि हॉकर्सकडून दंडाच्या नावाखाली ५०० ते ५ हजार रुपये उकळत असल्याची तक्रार व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांत नोंदविली.

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी (माजी सैनिक) विनामास्क, सॅनिटायझर, थर्मल गन अथवा ऑक्सिमीटर नसल्याचे कारण पुढे करत दुकानदारांवर रोज दंडात्मक कारवाई करतात. ५०० ते ५००० रुपयांपर्यंत ते दंड ठोठावतात. रोज होणाऱ्या कारवाईमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासकांच्या वाहनातून सोमवारी सायंकाळी ६ वाजता एक पथक गुलमंडी आले. तेथे त्यांनी विनामास्क लोकांवर कारवाई सुरू केली. एका विद्यार्थ्यांवरही कारवाई करू लागले. त्याच्याकडून दंडाची वसुली केली जात होती. विद्यार्थी गयावया करत असताना तेथे उभे माजी नगरसेवक, भाजपाचे कार्यकर्ते सुरेंद्र कुलकर्णी यांनी पथकाला समजावून सागण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथक त्यांचे काहीएक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

तेवढ्यात माजी आमदार किशनचंद तनवाणी देखील तेथे आले. त्यांनी देखील पथकाला, हवे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, पण त्या विद्यार्थ्याला सोडा, अशी विनंती केली. पथकाने तनवाणी यांनाही अरेरावीची भाषा केली. त्यामुळे संतापलेले व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी पथकाला चांगलीच मारहाण केली. पथकाने सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र ही घटना क्रांती चौक ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समजल्याने त्यांना तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. क्रांती चौक ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पथकातील कर्मचारी तक्रार देण्यासाठी बसून होते. मात्र, वृत्त देईपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

मनपा पथकाविरुध्द सिटी चौक ठाण्यात तक्रार अर्जमनपाच्या पथकाकडून कॅरीबॅग असो अथवा कोविडच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून अवाच्या सवा दंड वसुली केली जाते. त्याच्या बऱ्याचदा पावत्या दिल्या जात नाहीत. मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असा तक्रार अर्ज व्यापाऱ्यांनी सिटी चौक ठाण्यात दाखल केला.

गुंडांसारखी हप्ता वसुलीमी गुलमंडीवर वैयक्तिक कामानिमित्त गेलो होतो. तेथे महापालिकेचे नागरिक मित्र पथक दोन विद्यार्थ्यांना मास्क न लावल्याबद्दल दंड आकारत होते. दोन्ही विद्यार्थी अक्षरशः रडत होते. विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून व नागरिकांच्या म्हणण्यानुसार मी पथकाला समजावून सांगण्यासाठी गेलो. विद्यार्थ्यांसोबत त्यांची भाषा गुंडासारखी होती. माझ्या सोबतही अत्यंत उद्धट आणि असभ्य भाषेत पथकातील कर्मचारी बोलत होते. महापालिकेने तुम्हाला चांगल्या कामासाठी नेमले आहे, असे मी समजावून सांगत होतो. सभ्यतेची भाषा त्यांना कळतच नव्हती. त्यामुळे त्यांना कळेल या भाषेतच मला बोलावे लागले. घटनेनंतर माजी आ. किशनचंद तनवाणीसुद्धा तेथे आले. त्यांच्या समोरही पथकातील कर्मचारी तसेच वागत होते. या कर्मचाऱ्यांच्या विरोधात उद्या पोलिसांत तक्रार देणार आहे. महापालिका प्रशासकांची भेट घेऊन व्यथा मांडू.-सुरेंद्र कुलकर्णी, माजी नगरसेवक

टॅग्स :Municipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादCrime Newsगुन्हेगारी