मनसेच्या मोर्चाला पोलीसांनी औरंगपुऱ्यातच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 06:13 PM2020-11-26T18:13:06+5:302020-11-26T18:13:26+5:30

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अटक व सुटका

Police stopped the MNS march in Aurangpura | मनसेच्या मोर्चाला पोलीसांनी औरंगपुऱ्यातच रोखले

मनसेच्या मोर्चाला पोलीसांनी औरंगपुऱ्यातच रोखले

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी कलम १४९ नुसार नोटीस देऊन मोर्चाला मनाई आदेश दिला होता. 

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लॉकडाऊनच्या सामान्य वीजग्राहकांना दिलेल्या वाढीव वीजबिलांविरोधात काढलेला मोर्चा पोलीसांनी औरंगपुऱ्यातील महात्मा फुले चौकातच रोखला. मोर्चेकरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक करून सोडले.

महात्मा फुले चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मनसेने सामान्य वीजग्राहकांना सोबत घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मोर्चाच्या दोन दिवसांपूर्वी मनसेने मुख्य अभियंता भूजंग खंदारे यांच्यावर वाढीव वीजबिले भिरकावून निषेध केला होता. त्यानंतर गुरूवारी मोर्चाचे नियोजन केले होते. परंतु काल २५ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस एच.एस.भापकर यांनी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ लागू असून संचारबंदी सुरू, ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असल्याचे कळविले होते. कलम १४९ नुसार नोटीस देऊन मोर्चाला मनाई आदेश दिला होता. 

आदेशाचे उल्लंघन करून मोर्चा काढल्यास पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल असेही सपोआ भापकर यांनी म्हटले होते. नोटीस देऊन मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्याउपरही मनसेने गुरूवारी महात्मा फुले चौकातून मोर्चा काढण्याचा तयारी केली. सकाळी ९ वाजेपासून चौकात पोलीसांचा तगडा बंदोबस्त होता. मोर्चेकरी चौकात येताच, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.

जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होता मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रासह मोर्चाचे नियोजन होते. परंतु पोलीसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्योन ठाकरे यांचे पत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. जिल्हाप्रमुख सुहाय दाशरथे, शहराध्यक्ष सतनाम गुलाटी, अशोक पवार, प्रशांत जोशी, संदीप कुलकर्णी, चेतन पाटील, वृषभ रगडे आदींना पोलीसांनी ताब्यात घेतले. 

Web Title: Police stopped the MNS march in Aurangpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.