शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

लाच घेताना अधिकारी, कर्मचारी पकडल्यास ठाणेदारांना जबाबदार धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 18:17 IST

Bribe Cases in Aurangabad : लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. असे असले तरी सरकारी काम करण्यासाठी मोबदला म्हणून अधिकारी, कर्मचारी लाचेची मागणी करतात.

ठळक मुद्देयामुळे एखाद्या हवालदाराकडे अर्ज चौकशीसाठी दिल्यावर त्या अर्जावर २४ तासांत काय कारवाई झाली हे पाहण्याची जबाबदारी संबंधित ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची असते. एखादा हवालदार त्यास दिलेल्या अर्जावर तत्काळ कारवाई करीत नसेल तर त्याला याविषयी जाब विचारण्याचे काम ठाणेदाराचे आहे.

औरंगाबाद : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) लाचखोर सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सतत कारवाई करीत असते. असे असले तरी एसीबीला न जुमानता सर्वच सरकारी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना आढळतात. दरवर्षी महसूल विभागापाठोपाठ पोलीस विभागातील कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकतात. पाच महिन्यांत पोलीस दलातील १२ जण लाचेच्या जाळ्यात अडकले. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस आयुक्तांनी लाच घेताना पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी पकडला गेल्यास संबंधित ठाणेदाराला जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे. ( Police Inspector will be held responsible if Officers and employees are caught taking bribe) 

लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. असे असले तरी सरकारी काम करण्यासाठी मोबदला म्हणून अधिकारी, कर्मचारी लाचेची मागणी करतात. लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध एसीबीकडे येणाऱ्या तक्रारींची संख्या अर्ध्या टक्क्याहून कमी आहे. यावर्षी जानेवारी ते मे अखेरपर्यंत औरंगाबाद एसीबीने केलेल्या एकूण कारवाईत १२ पोलीस कर्मचारी पकडले गेले. जालना येथील उपविभागीय पोलीस अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकला गेला. तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी, गुन्ह्यातील आरोपीला गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली पोलीस लाचेची मागणी करतात, ही बाब समोर आली. यामुळे एखाद्या हवालदाराकडे अर्ज चौकशीसाठी दिल्यावर त्या अर्जावर २४ तासांत काय कारवाई झाली हे पाहण्याची जबाबदारी संबंधित ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची असते. एखादा हवालदार त्यास दिलेल्या अर्जावर तत्काळ कारवाई करीत नसेल तर त्याला याविषयी जाब विचारण्याचे काम ठाणेदाराचे आहे. यामुळे ज्या ठाण्यात एसीबीचा ट्रॅप झाला, त्या ठाण्याच्या ठाणेदाराला यापुढे जाब विचारला जाणार आहे. त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून उत्तर मागविले जात असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

एमआयडीसी वाळूज ठाण्यातील ट्रॅपनंतर नोटीसकाही दिवसांपूर्वी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात एक हवालदार लाचेच्या जाळ्यात अडकला आणि पोलीस उपनिरीक्षकाची एसीबीने चौकशी केली. या कारवाईनंतर ठाणेदाराची चौकशी करण्याचे निर्देश सहायक पोलीस आयुक्तांना दिल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस