औरंगाबाद शहर पोलीस दलातील ठाणेदारांची खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 13:18 IST2021-08-21T13:16:12+5:302021-08-21T13:18:52+5:30

Police Inspector Transfers in Aurangabad : पोलीस आयुक्तांचे तत्काळ रुजू होण्याचे फर्मान

Police Inspector Transfers in Aurangabad city police force | औरंगाबाद शहर पोलीस दलातील ठाणेदारांची खांदेपालट

औरंगाबाद शहर पोलीस दलातील ठाणेदारांची खांदेपालट

औरंगाबाद : राज्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्यानंतर आता शहर पोलिस दलातील ठाणेदारांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शहरातील एकूण 13 निरिक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री उशीरा दिले. सर्वांनी तत्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ रूजू होण्याचे फर्मान आयुक्तांनी दिले आहेत. 

वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांची बदली एमायडीसी वाळूज पोलीस स्टेशनला झाली आहे. वेदांतनगरचे रामेश्वर रोडगे यांची बदली सुरक्षा शाखेत, तर छावनीचे मनोज पगारे यांची बदली मुकुंदवाडी येथे करण्यात आली आहे. 

सिटी चौकचे संभाजी पावर यांची बदली सिडको येथे तर सिडकोचे निरीक्षक अशोक गिरी यांना सिटी चौक ठाणे देण्यात आले आहे. उस्मानपुराचे दिलीप तारे यांची बदली अर्ज चौकशी शाखेत केली.

क्रांतीचौक येथील अमोल देवकर यांची बदली हरसूल ठाण्यात करण्यात आली. एम. वाळूज येथील प्रशांत पोतदार यांची बदली बेगमपुरा येथे झाली आहे.  बेगमपुरा येथील सचिन सानप  यांची बदली वेदांतनगर येथे, हर्सूललचे सचिन इंगोले यांची वाळूज ठाण्यात करण्यात आली आहे.

मुकुंदवाडीचे शरद इंगले यांना छावणी येथील पदभार तर वाहतूक शाखा छावणी येथील दिलीप गांगुर्डे यांची बदली पुंडलिकनगर येथे  करण्यात आली आहे.  सायबरच्या गीता बागवडे यांना उसमानपुरा येथील पदभार सोपविन्यात आला आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागातून उशिरा हजर झालेले निरीक्षक ब्रम्हागिरी यांना दुय्यम निरीक्षक म्हणून मुकुंदवाडी येथे सेवा करण्याची संधी देण्यात आलेली आहे.

Web Title: Police Inspector Transfers in Aurangabad city police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.