पोलिस दलात आता ‘समाधान कक्ष’
By Admin | Updated: April 20, 2015 00:32 IST2015-04-20T00:21:55+5:302015-04-20T00:32:09+5:30
लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या दैनंदिन व कार्यालयीन समस्या जाणून घेण्यासाठी अध्यापपर्यंत कुठलीही सोय नव्हती

पोलिस दलात आता ‘समाधान कक्ष’
लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या दैनंदिन व कार्यालयीन समस्या जाणून घेण्यासाठी अध्यापपर्यंत कुठलीही सोय नव्हती परंतू आता कार्यालयीन समस्या सोडविण्यासाठी आता डॉ़ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी समाधान कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाच्या माध्यमातून पोलीसांच्या समस्याचे निराकरण करण्यात येणार आहे़
समाधान कक्षाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पेन्शन बील, वैद्याकीय काळातील पगार, सेवा पदोन्नती, भविष्य निर्वाह निधी, वेगवेगळ्या प्रकारच्या रजा,अशा विविध कार्यालयीन समस्या लेखी स्वरूपात घेऊन त्या समस्याचे निवारण करण्यासाठी संबंधित विभागाकडे वर्ग केल्या जाणार आहेत़तसेच त्या समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी या समाधान कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत़या प्रक्रियेमुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या विनाविलंब मार्गी लावण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे़
या समाधान कक्षाचे काम पाहण्यासाठी पोलीस दर्जाचा अधिकारी व पोलीस हवालदार या प्रमुख अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे़त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हा विधायक उपक्रम आहे़ त्यामुळे या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यातून त्यांचे स्वागत होत आहे़ जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या या संकल्पनेचे पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असून, पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या या समाधान कक्षातून सोडविल्या जातील, अशी अपेक्षा आहे.(प्रतिनिधी)