औरंगाबादमध्ये पोलीस पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 17:40 IST2021-06-02T17:39:27+5:302021-06-02T17:40:25+5:30

याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Police boy commit suicide by strangling in Aurangabad | औरंगाबादमध्ये पोलीस पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबादमध्ये पोलीस पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : क्रांतीचौक पोलीस कॉलनीतील पोलीस हवालदाराच्या तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजता समोर आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

किरण शेषराव मोरे (२४), असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार शेषराव मोरे यांचे क्रांतीचौक पोलीस कॉलनीत निवासस्थान आहे. बदली झाल्यापासून ते सहकुटुंब सिल्लोड येथे राहतात. त्यांचा लहान मुलगा किरण क्रांतीचौक पोलीस कॉलनीत राहत होता. चार दिवसांपूर्वी तो आई-वडिलांना भेटून आला होता. तेव्हा त्याने काम शोधतो असे सांगितले होते. 

मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा मित्र गणेश शिंदे भेटायला त्याच्या घरी गेला. तेव्हा किरणने छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेतल्याचे त्याला दिसले. अन्य रहिवाशांच्या मदतीने किरणला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी किरणला तपासून मृत घोषित केेले. याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किरण रागीट स्वभावाचा होता आणि तो फारसे कुणाला बोलत नव्हता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. सहायक फौजदार एम. ए. शेख तपास करीत आहेत.

Web Title: Police boy commit suicide by strangling in Aurangabad