औरंगाबादमध्ये भारत बंदला गालबोट; जमावाकडून पोलिसांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 15:05 IST2020-01-29T15:04:12+5:302020-01-29T15:05:24+5:30
जमावाने पोलिसांचा व्हिडिओ कॅमेरासुद्धा फोडला असल्याची माहिती आहे.

औरंगाबादमध्ये भारत बंदला गालबोट; जमावाकडून पोलिसांना मारहाण
औरंगाबाद: भारत बंदला शहरात गालबोट लागले असून एसटी बस अडविणाऱ्या जमावाने सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस हेड कॉंस्टेबल आणि कॉंस्टेबल यांना मारहाण केल्याची घटना दिल्ली गेट येथे घडली. यावेळी जमावाने पोलिसांचा व्हिडिओ कॅमेरासुद्धा फोडला असल्याची माहिती आहे.
बहुजन क्रांती मोर्चाने आयोजित भारत बंद दरम्यान एक जमाव शहरातील विविध भागात फिरून बंद चे आवाहन करीत होता. दुपारी एक ते सव्वा वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक येथून बाहेरगावी निघालेल्या एस टी महामंडळच्या बसला जमावाने अडविले. यावेळी समजावून सांगणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्याशी जमावाने अरेरावी केली. तसेच या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या पोलीस कर्मचारी संतोश जोशी आणि संजय भोटकर यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातातील कॅमेरा हिसकावून घेत फोडून टाकला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह अन्य अधिकारी , कर्मचारी आणि जमाव आमने सामने आहेत सध्या तणावपूर्ण शांतता आहे.