शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग नसलेल्या कोचिंग क्लासेसवरही पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2016 01:44 IST

औरंगाबाद : मंगल कार्यालये, लॉन्स व हॉटेल्सपाठोपाठ आता शहरातील कोचिंग क्लासेसही पोलीस आयुक्तांच्या रडारवर आहेत. ज्या क्लासेसच्या पार्किंगमुळे सार्वजनिक वाहतूक ठप्प होत आहे,

औरंगाबाद : मंगल कार्यालये, लॉन्स व हॉटेल्सपाठोपाठ आता शहरातील कोचिंग क्लासेसही पोलीस आयुक्तांच्या रडारवर आहेत. ज्या क्लासेसच्या पार्किंगमुळे सार्वजनिक वाहतूक ठप्प होत आहे, अशा क्लासेसचा पोलिसांनी सर्व्हे सुरू केला आहे. सर्व्हेनंतर यासंदर्भात उपाययोजना करण्याची त्यांना मुदत दिली जाईल. सदरील कालावधीत त्यांनी उपाय केले नाही तर त्यांच्यावर हॉटेल, लॉन्स व मंगल कार्यालयांसारखी कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यावर वाहने उभे करीत असल्याने शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले आहे. लग्नसमारंभांमुळे सतत वाहतूक ठप्प होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याकरिता अमितेशकुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी त्यांनी शहरातील हॉटेल्स, मंगल कार्यालये व लॉन्स संचालक व व्यवस्थापकांची बैठक घेतली. त्यामध्ये रस्त्यावर वाहने उभी राहणार नाही ही संपूर्ण जबाबदारी तुमचीच राहील. वाहने आढळून आली तर थेट संचालकांवर कारवाई केली जाईल. तसेच १२ मेपासून कायमचे सील करण्याचीही कारवाई केली जाईल, असा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर शहरात खाजगी कोचिंग क्लासेसची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात आहे. काही क्लास चालकांकडे स्वत:ची पार्किंग व्यवस्थाच नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजूलाच विद्यार्थ्यांची वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याकरिता पोलीस आयुक्तांनी हा सर्व्हे सुरू करण्याचा आदेश दिला आहे. संबंधित पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, चार्ली व पीसीआर मोबाईलमार्फत हा सर्व्हे सुरू आहे. या सर्व्हेनंतर त्यांची बैठक घेऊन, १५ ते २० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. क्लासेस चालकांची पार्किंग रस्त्यावर असल्याने सोसायटीतील रहिवाशांना त्रास होतो. त्याचबरोबर वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. याकरिता आम्ही अशा क्लासेसचा सर्व्हे सुरू के ला आहे. यानंतर त्यांना उपाययोजना करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. त्यांनी या मुदतीत पार्किंगची व्यवस्था केली नाही तर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. - अमितेशकुमार, पोलीस आयुक्त