छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील सावंगी परिसरातील एका नामांकित इंग्रजी शाळेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सहावीत शिकणाऱ्या अवघ्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील चार मित्रांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडित मुलाच्या पालकांनी केला आहे.
पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेच्या मैदानावर हा घृणास्पद प्रकार घडला. वर्गातील चार विधिसंघर्षग्रस्त मुलांनी पीडित विद्यार्थ्याला अडवून, त्याला विवस्त्र करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक दिवसांपासून हे मुले त्याला अश्लील इशारे करून मानसिक त्रास देत होती. या दहशतीमुळे मुलगा प्रचंड घाबरलेला होता. अखेर ५ डिसेंबर रोजी त्याने रडत-रडत आपल्या वडिलांना ही आपबिती सांगितली.
शाळेचा असहकार आणि पालकांवर दबाव घटनेची माहिती मिळताच पालक शाळेत गेले, मात्र शाळा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याऐवजी उलट दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला आहे. "माझा मुलगा काही दिवसांपासून रडत होता, शाळेत जाण्यास घाबरत होता. आम्ही शाळेत गेलो तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली," असे पीडित मुलाच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रशासनाची भूमिका, मंत्री दादा भुसे यांचे आदेशया प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शिक्षण विभागाने तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, सर्व आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्याय कायद्यानुसार पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सहाणे यांनी दिली आहे.
Web Summary : A shocking incident occurred in Chhatrapati Sambhajinagar where a sixth-grade student was sexually assaulted by classmates. A POCSO case has been registered. The school allegedly tried to suppress the matter, prompting parental outrage and a police investigation.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक प्रतिष्ठित स्कूल में छठी कक्षा के छात्र के साथ उसके सहपाठियों द्वारा यौन उत्पीड़न का मामला सामने आया है। पोक्सो अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है। स्कूल पर मामले को दबाने का आरोप है।