शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

PMC BANK : 'बँकेने पैसे बुडवले, सणासुदीच्या काळात काय करायचे'; पैसे मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 17:21 IST

रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर निर्बंध लादल्याने ग्राहकांमध्ये खळबळ 

ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये पीएमसी बँकेत ८ हजार खातेदारांचे ८० कोटी अडकलेअनेक ग्राहकांनी शाखेत येऊन व्यक्त केला संताप 

औरंगाबाद : 'बँकेने पैसे बुडवले, सणासुदीच्या काळात काय करायचे'; पैसे मिळत नसल्याने ग्राहक हवालदिल झाले असून शाखेमध्ये मोठी गर्दी केली आहे. त्रुटी आढळून आल्याने रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. परिणामी, शहरातील या बँकेच्या दोन शाखेत मिळून सुमारे ८ हजार खातेदारांचे ७० ते ८० कोटी रुपये अडकले आहेत. पुढील सहा महिन्यात खात्यातून १ हजार रुपयेच काढता येणार असल्याने ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे.    

रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध आणल्याचे सकाळी ९  वाजता खातेदारांच्या मोबाईलवर मेसेज पाठविले. टिव्ही चॅनलवरही बातम्या झळकल्या यामुळे शहरातील या बँकेच्या खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली. बँकेचे शहरात दोन शाखा असून त्यातील एक आकाशवाणी रोडवर व दुसरी उस्मानपुऱ्यात आहे. या दोनी शाखा उघडण्या आधीच खातेदारांनी गर्दी केली होती. 

व्यवस्थापकांनी नोटीस चिटकवली १० वाजता बँकेचे शटर उघडले त्यावेळीस व्यवस्थापकांनी एक नोटीस समोरील बाजूस चिटकविली. त्यावर लिहिण्यात आले होते की, बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमधील नियम ३५ ब अंतर्गत पुढील ६ महिने व्यवहारावर निर्बंध आणण्यात आले आहे. खातेदारांना सहा महिन्यात एकदाच त्यांच्या खात्यातून १ हजार रुपये काढता येणार आहे. ही नोटीस वाचून खातेदार बँकेत शिरत होते. काहींनी १ हजार रुपये काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. तर काहींजण व्यवस्थापकास घेरावा घातल त्यांच्यावर प्रश्नांचा भिडमार करीत होते.' बँकेन पैसे बुडवले, आमचे पैसे आधी द्या मग कारवाई करा, सणासुदीच्या दिवसात काय करायचे', अशा शब्दात आपल्याच खात्यातून आपलेच पैसे काढता येणार नसल्याने खातेदार संताप व्यक्त करत होते. 

त्रुटी दूर करूसुमारे १५० ते २०० खातेदारांनी आज पैसे काढले. अनेक खातेदारांनी पैसे काढले नाही. ६ महिन्याच्या आत व्यवहारातील त्रुटी दूर करु व पुन्हा बँक जोमात सुरु होईल, असे खातेदारांना सांगत आहोत.- शंकर उसारे, शाखा व्यवस्थापक