करमाड-लाडसावंगी रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:42 IST2019-08-27T21:42:48+5:302019-08-27T21:42:57+5:30

करमाड-लाडसावंगी गावांतर्गत मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे.

Pits on the Karamad-Ladaswangi road | करमाड-लाडसावंगी रस्त्यावर खड्डे

करमाड-लाडसावंगी रस्त्यावर खड्डे

करमाड : येथील करमाड-लाडसावंगी गावांतर्गत मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे.


गेल्या वर्षी करमाड-लाडसावंगी या गावांतर्गत मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यत रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले. परंतु पुढे रेल्वे फाटकपर्यंतचे काम सोडून देण्यात आले. त्यामुळे आता थोड्या पावसाने याठिकाणी जागोजागी खड्डे पडले आहेत.

या मार्गावर शाळा, रेल्वे स्टेशन, बँक असून, याठिकाणी जाणाºया विद्यार्थी, प्रवाशी व पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. याठिकाणी दुचाकी चालकांचे नेहमी अपघात होत आहेत. या मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी योगेश कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Pits on the Karamad-Ladaswangi road