भाजप पदाधिकाऱ्यावर अपहरण करून रोखले पिस्तूल
By Admin | Updated: April 8, 2016 00:29 IST2016-04-07T23:56:08+5:302016-04-08T00:29:23+5:30
बीड : चारा छावण्यांमधील पैशाचे व्यवहार मुद्द्यावरुन गुद्द्यावर येऊ लागले आहेत. भाजप तालुका उपाध्यक्ष सुधीर शिंदे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या

भाजप पदाधिकाऱ्यावर अपहरण करून रोखले पिस्तूल
बीड : चारा छावण्यांमधील पैशाचे व्यवहार मुद्द्यावरुन गुद्द्यावर येऊ लागले आहेत. भाजप तालुका उपाध्यक्ष सुधीर शिंदे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी गुंजाळ यांचे पती बाळासाहेब गुुंजाळ यांच्यासह चार जणांनी पैशावरुन अपहरण केले, शिवाय त्यांच्यावर पिस्तूलही रोखले. ही खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली.
पोलीस सूत्रांनुसार, शिंदे व गुंजाळ यांच्यात छावण्यांवरुन पैशाचे व्यवहार झाले होते. त्यानंतर त्यांच्यात खटके उडाले होते. त्याचे पर्यावसान अपहरण व पिस्तूल रोखण्यात झाले. शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाच्या मागील रस्त्यावरुन त्यांचे गुंजाळ व इतर चौघांनी अपहरण केले. ‘तुझ्यामुळे आमच्या छावणीचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. भरपाई म्हणून तू वीस लाख रुपये दे’ असे म्हणत त्यांना धमकावले. त्यानंतर त्यांना तेलगाव रस्त्यावरील एका खडी क्रशरवर नेऊन बेदम मारहाण केली व त्यांच्या डोक्यावर पिस्तूलही रोखले. तेथून गुंजाळ व त्याचे साथीदार पसार झाले. शिंदे यांनी शिवाजीनगर ठाणे गाठले. त्यावरुन बाळासाहेब गुंजाळ, नितीन गरड व इतर तिघांविरुद्ध गुन्हा अपहरण, मारहाण, आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद झाला.
या संदर्भात फौजदार के. एस. लहाने यांच्याशी वारंवार संपर्क केला असता, त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. ठाण्यातही माहिती देण्यास टाळाटाळ केली. (प्रतिनिधी)