पिंपळनेर जि.प.गटात ६१ टक्के मतदान
By Admin | Updated: April 18, 2016 00:58 IST2016-04-18T00:31:25+5:302016-04-18T00:58:02+5:30
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे जि.प. पोटनिवडणुकीत ६१.४१ टक्के मतदान झाले. ४०६० मतदारांपैकी २४५३ मतदारांनी आपला हक्क बजावला.

पिंपळनेर जि.प.गटात ६१ टक्के मतदान
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे जि.प. पोटनिवडणुकीत ६१.४१ टक्के मतदान झाले. ४०६० मतदारांपैकी २४५३ मतदारांनी आपला हक्क बजावला.
भाजपाचे मनोज पाटील, काँग्रेसचे नवनाथ थोटे तर शिवसंग्रामचे गोपीनाथ घुमरे यांच्याशिवाय तीन अपक्ष उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. संवेदनशील म्हणून घोषित असलेल्या पिंपळनेर, बाभुळवाडी, सुर्डी, नाथापूर या गावांत चोख पोलीस बंदोबस्तात शांततेत मतदान झाले. ३७ गावांत मतदान पार पडले. सकाळी ११ वाजेपर्यंत २० टक्के मतदान झाले. दुपारी उन्हामुळे मतदार घराबाहेर पडले नाहीत. दुपारी ४ वाजेनंतर मतदानाला वेग आला.
तीन ग्रा.पं.साठी ८८ टक्के मतदान
गेवराई तालुक्यातील पाचेगाव तांडा, जयरामनाईक तांडा व वसंतनगर तांडा या तीन ग्रा. पं. साठी ८८ टक्के मतदान झाले. ५७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
मुळे-धोंडे यांचे भवितव्य मतदानयंत्रात
आष्टी पंचायत समिती गणाचे सदस्य रंगनाथ धोंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी राकाँचे अशोक मुळे व भाजपचे गणेश धोंडे यांच्यात सरळ लढत झाली. ४९.४१ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत झाली. (वार्ताहर)