शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरुपी योजनेचे ‘पाणी’ !

By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST

संदीप अंकलकोटे, चाकूर तालुक्यातील १७ गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सक्षमपणे चालत नसल्याने दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला़

संदीप अंकलकोटे, चाकूरतालुक्यातील १७ गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सक्षमपणे चालत नसल्याने दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतला़ त्यामुळे दोन दिवस पाण्याशिवाय कसे काढायचे? असा सवाल होण्याबरोबरच या गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढवली आहे़ परिणामी कायमस्वरूपी पाणी योजनेचा बट्ट्याबोळ झालेला पहावयास मिळत आहे़चाकूर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १७ गावांसाठी घरणी प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेवर कोटी रूपये खर्च करण्यात येऊन सन २००१ मध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली़ या योजनेत आटोळा, धामणगाव, उजळंब, कुंभेवाडी, आंबेवाडी, कबनसांगवी, अजनसोंडा खु़, तिवघाळ, तिवटघाळ, तळघाळ, बनसावरगाव, नागेशवाडी, लातूररोड, मोहनाळ, कडमुळी, भाटसांगवी, हाळी खु़, वाघोली या गावांचा समावेश होत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या योजनेचे काम केले आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजना अहमदपूरकडेही हस्तांतरीत करण्यात आली़ या योजनेची जलवाहिनी सतत फुटत असल्याने या ग्रामस्थांना ही योजना असून अडचण अन् नसून खोळंबा अशी स्थिती आहे़ या योजनेची मुख्य जलवाहिनी नेहमीच फुटते़ त्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाहून जाते़ योजना सुरळीत चालत नसल्याने अखेर या योजनेचे पाणी दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़या योजनेतंर्गत १९ हजार ९४ लोकांना पाणी मिळाले पाहिजे़ त्यासाठी दररोज ७ लाख ६३ हजार लिटर्स पाणी मिळाले पाहिजे़ परंतु, दोन दिवसाला पाणी मिळणार असल्याने आगामी काळात पाण्याचा प्रश्न आणखीन गंभीर होण्याची भिती व्यक्त होत आहे़ तलावात पाणी असताना ग्रामस्थांना वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला अपयश आले़ जेव्हा ही योजना सुरु करण्यात आली़ त्यावेळी जलवाहिनी फुटून ग्रामस्थांना पाणी मिळत नसे़ चाकूर तालुक्याची निर्मिती १५ आॅगस्ट १९९२ ला झाली़ या कार्यालयाची चाकूर येथे स्वतंत्र कार्यालय व्हायला हवे होते़ परंतु, अहमदपूरमधून या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा कारभार हाकला जातो़ या योजनेचे पाणी मिळत नसल्याने, भाटसांगवी, हाळी खु़, वाघोली या तीन ग्रामपंचायतीने या योजनेतून बाहेर पडून आपल्या गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरु केली़ ही योजना चालविण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मासिक दोन ते अडीच लाख रूपये खर्च होतात़