शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाला स्थायीचा हिरवा कंदील

By admin | Updated: July 8, 2014 00:35 IST

नांदेड : शहर स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या कारणावरून एटूझेड कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला़

नांदेड : शहर स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या कारणावरून एटूझेड कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला़ दरम्यान सन २०१४ चा महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायीने मंजूर केला़ येत्या आठ दिवसात अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे़ स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अर्थसंकल्प मंजुरीसाठी तब्बल तीन तास विशेष सभा घेण्यात आली़ यावेळी अर्थसंकल्पासह इतर विषयावर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले़ मागील काही दिवसांपासून शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या एटूझेड कंपनीच्या तक्रारी वाढल्या होत्या़ ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे शहरात अस्वच्छ पसरली आहे़यासंदर्भात मनपाच्या आरोग्य विभागानेही एटूझेड कंपनीच्या कामाबाबत आक्षेप घेवून असमाधान व्यक्त केले होते़ हा विषय स्थायी सभेत चर्चेत आल्यानंतर सदरील कंत्राटदाराकडून हे काम रद्द करण्याची मागणी सदस्यांनी केली़ रमजान महिना होईपर्यंत काम सुरू ठेवून नंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असा ठराव संमत करण्यात आला़ दरम्यान, महापालिकेचा सन २०१४- १५ चा १ हजार ३ कोटी ४९ लाखाचा अर्थसंकल्प स्थायी सभेत मंजूर होवून तो सर्वसाधारण सभेत लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे सभापती उमेश पवळे यांनी सांगितले़ येत्या दोन, तीन दिवसात सदस्यांना उत्पन्नवाढीसाठी सूचना करण्याचे सांगण्यात आले आहे़ बीएसयुपीच्या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अपील कंपनीच्या संदर्भातही सभापती पवळे यांनी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या़ प्रत्येक प्रभागात ५० लाखांचा विकास निधी वाटप करून अविकसित भागासाठी विशेष निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ मालमत्ता करासंदर्भात अप्पर आयुक्त व स्थायी समिती सभापती यांची समिती स्थापन करण्यात आली़ श्री गुरूगोविंंदसिंघजी स्टेडियम हे आतंरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी १ कोटी ४० लाख रूपयांच्या कामास मान्यता देण्यात आली़ हे काम बंगळूर येथील एस़ ग्रीन मास्टर्स स्पोटर्स या कंपनीला देण्यात आले आहे़ सभेच्या प्रारंभी नुतन अप्पर आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे यांचे स्वागत सभापती पवळे यांनी केली़ सभेला सर्व विभाग प्रमुख व सदस्यांची उपस्थिती होती़ तीन तास चाललेल्या सभेत शहरातील ससस्यांवर चर्चा करून त्यावर उपाय सुचविण्यात आले़ (प्रतिनिधी)