शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत महिला मतदारांचा टक्का वाढला

By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. सरासरी ४२.३० महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. सरासरी ४२.३० महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पाच महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील महिलांचे मतदान बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरासरी १० टक्क्यांनी वाढले आहे. नवमतदारांमध्ये युवतींचाही उत्स्फुर्त सहभाग दिसून आला.जिल्ह्यात पाचही मतदारसंघात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी २५ हजार ३७० नवीन मतदारांची संख्या वाढली आहे. यामध्ये सरासरी १२ टक्के महिला मतदारांची वाढीव संख्या सरासरी १२ टक्के होेती. जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. लोकसभेकरीता जालना मतदारसंघातून ६७ हजार ६९, बदनापूरमधून ७९ हजार ५३५ तर भोकरदनमधून ८३ हजार १०१ महिला मतदारांनी मतदान केले होते. याच तिन्ही मतदारसंघातून विधानसभेकरीता अनुक्रमे जालना ७९ हजार ४३८, बदनापूर ८४ हजार ३३ व भोकरदन ९० हजार ६६४ एवढ्या महिला मतदारांनी मतदान केले. परतूर व घनसावंगी मतदारसंघ लोकसभेकरीता परभणी मतदारसंघात होते. मात्र या दोन्ही मतदारसंघातही या निवडणुकीत महिलांच्या मतदानाचे प्रमाण वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. परतूरमधून ८५ हजार ८६५ तर घनसावंगीतून ९९३७२ महिलांनी मतदान केले. (प्रतिनिधी)