सलीम अली सरोवरानजीकची अतिक्रमणे काढताना पथकावर नागरिकांचा हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:50 IST2019-07-16T14:43:40+5:302019-07-16T14:50:39+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला.

people attacks on Municipality team while removing the encroachment of Salim Ali Sarovaran | सलीम अली सरोवरानजीकची अतिक्रमणे काढताना पथकावर नागरिकांचा हल्ला 

सलीम अली सरोवरानजीकची अतिक्रमणे काढताना पथकावर नागरिकांचा हल्ला 

औरंगाबाद : दिल्ली गेट येथील ऐतिहासिक सलीम अली सरोवर येथे अतिक्रमणांची संख्या बरीच वाढली होती. आज (दि.१६ ) दुपारी बारा वाजता महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला. यावेळी अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या पथकावर हल्ला चढविला जेसीबी मशिनच्या काचा फोडल्या, अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेनंतर महापालिकेने मोठा पोलीस बंदोबस्त मागवून जोरदार कारवाई केली. 

शेवटच्या टप्प्यात कारवाई सुरू असताना पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात संबंधित नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेने यापूर्वीही सरोवराजवळ दहा ते पंधरा वेळेस अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. दुसऱ्या दिवशी परत नागरिक अतिक्रमणे करतात. अतिक्रमणे हटविल्यानंतर महापालिका जागा ताब्यात घेण्याची कारवाई करत नाही. यामुळे ही अतिक्रमणे पूर्ववत होतात. 

Web Title: people attacks on Municipality team while removing the encroachment of Salim Ali Sarovaran