शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
7
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
8
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
9
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
10
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
12
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
13
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
14
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
15
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
16
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
17
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
18
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
19
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
20
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
Daily Top 2Weekly Top 5

पाटील, मोटे आज उमेदवारी दाखल करणार

By admin | Updated: September 25, 2014 00:54 IST

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राणाजगजितसिंह पाटील व राहुल मोटे हे २५ सप्टेंबर रोजी तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राणाजगजितसिंह पाटील व राहुल मोटे हे २५ सप्टेंबर रोजी तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही पक्षाकडून मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातून राकँतर्फे माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील हे गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धारासूर मर्दिनी, ख्वॉजा शमशोद्दीन गाझी रहे. दर्गाह येथे दर्शन घेवून लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येईल, असे राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी कळविले आहे. तसचे भूम-परंडा-वाशी या मतदार संघातून राकाँच्या वतीने विद्यमान आ. राहुल मोटेही गुरूवारीच उमेदवारी दाखल करणार आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर गौलाई चौकातून पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा ओंकार चौक, नगर परिषद चौक, वेताळ रोड मार्गे आण्णा भाऊ साठे गोलाई चौकातून साहील दूधसंकलन केंद्र येथे दाखल होईल. त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, तुळजापूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे शुक्रवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमित देशमुख, बसवराज पाटील यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळीच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर हडको मैदानावर जाहीर सभा घेण्यात येणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील व माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे यांनी कळविले आहेत. (प्रतिनिधी)