शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे रुग्ण अडचणीत

By admin | Updated: July 3, 2014 00:22 IST

श्रीक्षेत्र माहूर : येथील ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील पाचही आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संपावर असल्याने तालुक्यातील रुग्णांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

श्रीक्षेत्र माहूर : येथील ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील पाचही आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संपावर असल्याने तालुक्यातील रुग्णांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. येथील बसस्थानकात मरण पावलेल्या अनोळखी वृद्धास विना शवविच्छेदन पोलिसांनी दफन केल्याची घटना २ जुलै रोजी घडली.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्या शासनाने मंजूर न केल्याने त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संप, आंदोलन सुरू केले. माहूरचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एस. कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एन. भोसले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, डॉ. निरज कुंभारे, डॉ. एल. डी. नाईक, डॉ. किशन नाईक, डॉ. नसरीन जुबेरी, डॉ. पवार, डॉ. चव्हाण, डॉ. जोगदंड यांनी नांदेड येथे सुरू असलेल्या संताप सहभाग घेतला. येथील ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील आष्टा, ईवळेश्वर, वाईबाजार, सिंदखेड, वानोळा या आरोग्य केंद्रातही नागरिक रुग्णांवर साधे प्रथमोपचार न मिळाल्याने रुग्णांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.धर्माबादेत रुग्णांना फटकाधर्माबाद : राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संपावर गेल्याने धर्माबादेत रुग्णांचे हाल होत आहेत. शासकीय रुग्णालयात उपचार होत नसल्याने रुग्ण खाजगी रुग्णालयाकडे वळले आहेत. रामतीर्थला परिणाम नाहीशंकरनगर : विविध मागण्यासाठी राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी १ जुलैपासून संपावर गेले असले तरी रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचे डॉ. भाटापूरकर यांनी सांभाळल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम दिसून येत नाही.२००९-१० मध्ये सेवेत आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देणे, सेवानिवृत्तीचे वय ६२ करणे, पदवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढणे आदी मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत. त्यात रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तोटावार यांचाही समावेश आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांची हेळसांड होवू नये म्हणून जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने अत्यावश्यक वैद्यकीय सेवा (१०८) विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित रुग्णालयात सेवेसाठी पाठविण्यात आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोहगाव ता. बिलोली येथील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा (१०८) चे डॉ. श्यामसुंदर बापूराव भाटापूरकर रुजू झाले आहेत. त्यामुळे रुग्णांची सोय झाली. (वार्ताहर)विना शवविच्छेदन मृतदेहाची विल्हेवाटमाहूर येथील बसस्थानकावर एक ६५ वर्षीय वृद्ध तीन दिवसापासून बेवारस स्थितीत पडून होता. २ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात आणले असता शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रेतात दूर्गंधी सुटल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय कांबळे, पोलिस निरीक्षक डॉ. जगताप यांनी योग्य ती कार्यवाही करुन प्रेताची दफनविधी केली.