शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेच झाले गतिरोधक

By admin | Updated: June 12, 2014 00:20 IST

नांदेड : वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक बसविले जातात़ मात्र शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून हे खड्डेच गतिरोधकाचे काम करत असल्याचे दिसून येते़

नांदेड : वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक बसविले जातात़ मात्र शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून हे खड्डेच गतिरोधकाचे काम करत असल्याचे दिसून येते़नांदेड शहराची लोकसंख्या सहा लाखांपेक्षा अधिक आहे़ जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, बीएसएनएल भवन, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, सेवायोजन नोंदणी, शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिकवणी वर्ग यासह श्रीनगर, वजिराबाद, जुना मोंढा, बर्की चौक परिसरात मुख्य बाजारपेठ आहे़ ही सर्व कार्यालये तरोडा नाका ते बर्की चौक या एकाच मार्गावर आहेत़ जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने बाहेरगावाहून विविध कामांसाठी हजारो नागरिक शहरात दाखल होतात़शहराची लोकसंख्या लक्षात घेता आजघडीला दीड लाख दुचाकी, आरटीओ कार्यालयाच्या नोंदीनुसार दहा हजार आॅटो यासह लहान-मोठी चारचाकी वाहने व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांचा या रस्त्यावर राबता असतो़ कार्यालयीन वेळेत वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते़ तरोडा नाका ते बर्की चौक हे अंतर जवळपास सहा किलो मीटर आहे़ या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ एखाद्या जागची दुरुस्ती झाली की, लगेचच दुसऱ्या जागी खोदकाम केले जाते़ कोणता रस्ता कधी खोदून ठेवला जाईल, याचा काही नेम राहिला नाही़ पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे बुजवणे, डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे़ किमान पावसाळ्यात तरी खड्डे खोदले जावू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी) रस्त्याची पोखरणएका खाजगी कंपनीने मोबाईल टॉवर टाकण्यासाठी सबंध शहरातील रस्ते ड्रील करुन पोखरण्यात आले़ उपलब्ध माहितीनुसार जवळपास ८० किमी रस्ते खोदण्यात आलेत़ केबल जोडणीसाठी खोदलेले खड्डे योग्यरित्या बुजविण्यात आले नाहीत़ परिणामी पावसाचे पाणी जमिनीत मुरुन रस्ते दबण्याची शक्यता नाकारता येत नाही़ खाजगी कामासाठी रस्ते खोदताना कुठलीही परवानगी घेतल्या जात नाही़ कोणी रस्ते खोदलेच तर त्यांच्यावर कारवाई केली जात नाही़