शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग’

By admin | Updated: April 16, 2016 00:10 IST

आष्टी : राज्याचे माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते अहमदनगर-बीड जिल्ह्याच्या

आष्टी : राज्याचे माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते अहमदनगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील चिंचपूर (ता. आष्टी) येथे सकाळी ११ वाजता इमर्जन्सी लँड करावे लागले.माजी खा. अंकुशराव टोपे यांच्या निधनामुळे जालना जिल्ह्यातील अंबड येथे आ. राजेश टोपे यांचे सांत्वन करण्यासाठी कदम हे हेलिकॉप्टरमधून गेले होते. तेथून ते अकलूज (जि. सोलापूर) येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भावाचे निधन झाल्यामुळे सांत्वन करण्यासाठी निघाले होते. त्यांचे हेलिकॉप्टर आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथे आले तेव्हा त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यामुळे १५ मिनिेटे खोळंबा झाला. यावेळी पतंगराव कदम हेलिकॉप्टरमधून खाली उतरले. तांत्रिक दुरुस्ती झाल्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा आकाशात झेप घेतली. यावेळी जामखेड येथील पोलीस तेथे दाखल झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना याची माहिती कळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आष्टी ठाण्याचे पोलीसही चिंचपूरकडे रवाना झाले; परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच हेलिकॉप्टर अकलूजकडे मार्गस्थ झाले होते. या वृत्ताला आष्टी ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दुजोरा दिला.