शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाढवा अभियान थंडावले

By admin | Updated: September 15, 2014 00:57 IST

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ राबविण्यात येत आहे.

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ राबविण्यात येत आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाच्या सुरुवातीच्या महिनाभरात विविध मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढली; परंतु गेल्या काही दिवसांपासून हे अभियान थंडावल्याचे चित्र दिसत आहे. १ आॅगस्टपासून प्रवासी वाढवा विशेष अभियानास सुरुवात झाली. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारास, विभागास आणि वाहकास रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे अभियानात यशस्वी कामगिरी करून पारितोषिक मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कंबर कसली. या अभियानात सेवेचा दर्जा वाढविणे, उत्पन्न वाढविणे, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन प्रवाशांना एसटी बसेसच्या प्रवासाकडे वळविण्याची सूचना करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या या अभियानात दोन महिन्यांचे नियोजन करण्यात आले; परंतु अभियानाच्या सुरुवातीच्या काही दिवसांनंतर मात्र, प्रवासी वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात काहीसे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येते. आगाराची स्वच्छता, बसेसची स्वच्छता यासह अभियानात करण्यात आलेल्या अनेक सूचनांकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.अभियानाचे केवळ १५ दिवस शिल्लक आहेत. पक्ष पंधरवड्यामुळे सध्या प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील बसगाड्या रद्द करण्याची वेळ येत आहे. तरीही अभियानात अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे मध्यवर्ती बसस्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ८० लाख रुपयांचे उत्पन्न आॅगस्ट महिन्यात राखीपौर्णिमेनिमित्त विभागास ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी राखीपौर्णिमेनिमित्त विभागास जवळपास ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यामध्ये ३० लाख रुपयांनी वाढ झाली. याशिवाय स्वातंत्र्य दिनाची सुटी आणि त्यानंतर शनिवार, रविवार आल्याने सलग सुटी घेऊन विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याचा अंदाज घेऊन विभागातर्फे जादा बसेसचे नियोजन करण्यात आले. प्रवासी वाढवा अभियानासाठी आॅगस्ट महिना महत्त्वपूर्ण ठरला; परंतु सप्टेंबर महिन्यात या उलट परिस्थिती दिसून येत आहे.