शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वांसाठी घरे’ प्रकल्पासाठी परभणी शहराची निवड

By admin | Updated: February 17, 2016 23:13 IST

राजन मंगरूळकर, परभणी प्रत्येक कुटुंबास सर्व सुविधांसह पक्के घर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना अभियान अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे़

राजन मंगरूळकर, परभणीप्रत्येक कुटुंबास सर्व सुविधांसह पक्के घर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना अभियान अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे़ या प्रकल्पासाठी परभणी महानगरपालिका क्षेत्राची निवड करण्यात आली आहे़ त्यामुळे या योजनेंतर्गत शहरातील नागरिकांना मनपा क्षेत्रात योजनेचा लाभ घेता येणार आहे़ प्रधानमंत्री आवास योजना २५ जून २०१५ रोजी सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती़ या अभियाना अंतर्गत सन २०१५ ते २०२२ या कालावधीत ही योजना देशभरात राबविली जाणार आहे़ पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या योजनेत महाराष्ट्रातून परभणी शहराची निवड झाली आहे़ याबाबत शासनाकडून मनपाला योजनेची माहिती देण्यात आली होती़ त्यानुसार १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय सभागृहासमोर मांडण्यात आला़ या योजनेविषयीची माहिती सभागृहाला देण्यात आल्यानंतर सभागृहाने एकमताने ही योजना शहरात राबविण्याबाबत मंजुरी दिली़ त्यानुसार महानगरपालिकेकडून शासनाला योजनेच्या मान्यतेबाबतचा प्रस्ताव पुढील काही दिवसांमध्ये पाठविण्यात येणार आहे़ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक व शहरातील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे़ या शिवाय इतर पात्र लाभार्थ्यांना देखील सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे़ सदर योजनेत केंद्र शासनाकडून लाभार्थ्यास घर बांधणीसाठी ६ लाख रुपये सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या कुटुंबामध्ये पती, पत्नी व अविवाहित मुले यापैकी त्यांच्या नावावर व त्यांच्या सदस्याच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसले पाहिजे़ योजनेत चटई क्षेत्र ३० वर्ग मीटर तर ३२५ चौरस फूट क्षेत्रफळ घर बांधण्यासाठी असणे गरजेचे आहे़ ज्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत आहे़ अशा अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना योजनेचा लाभ घेता येणार आहे़ परभणी शहरातील ७१ गलिच्छ वस्तीचा विकास करण्यासाठी या वस्तीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याबाबत महापालिकेकडून शासनाला सभागृहाच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़ यानंतर या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासनस्तरावरून सुरू होणार आहे़