शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कामाला मिळेना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:07 IST

शहरातील जिल्हा स्टेडियम परिसरात रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे़ या कामामुळे वाहनधारकांबरोबरच या भागातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत़ महापालिकेने कंत्राटदारांकडून सातत्यपूर्ण काम करून घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील जिल्हा स्टेडियम परिसरात रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे़ या कामामुळे वाहनधारकांबरोबरच या भागातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत़ महापालिकेने कंत्राटदारांकडून सातत्यपूर्ण काम करून घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे़जिल्हा स्टेडियम परिसरात रस्त्याच्या कामाला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली़ त्यापूर्वी अनेक वेळा उद्घाटनांमध्ये रखडलेल्या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागल्याने व्यापाºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते़ मात्र काम सुरू झाल्यानंतर हा रस्ता खोदून ठेवला असून, रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे़ दोन महिन्यांपासून काम रखडलेले आहे़ या कामाने अद्यापही गती घेतली नाही़ परिणामी परिसरातील व्यापाºयांना मोठा त्रास सहन करावा लागतोय़ रस्ता खोदून ठेवल्याने ग्राहकांवरही परिणाम झाला आहे़ दसरा, दिवाळी या दोन्ही सणांच्या काळात रस्त्याच्या कामामुळे ग्राहकांचे प्रमाण कमी राहिले़ परिणामी व्यापाºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला़ मात्र रस्ता होत असल्याने व्यापारी देखील हा फटका सहन करीत आहेत़ परंतु, या कामाला गतीच मिळेना झाली़ आठ-आठ दिवस काम बंद राहते़ दोन दिवसांपूर्वी या भागातील विजेचे खांब काढून घेण्याचे काम करण्यात आले़ परंतु, त्यातील एक खांब अजूनही काढून घेतला नाही़ त्यामुळे केवळ एका खांबामुळे रस्त्याचे काम रखडले आहे़ त्यामुळे हा रस्ता वेळेत पूर्ण होण्याची शक्यता ओसरत चालली आहे़ महापालिकेने याकडे लक्ष देवून कामाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे़