शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क द्या

By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST

औरंगाबाद : शासकीय जागेवर वास्तव्य करीत असलेल्या भूमिहीन शेतमजूर, दलित, आदिवासी कुटुंबांना त्यांच्या घराचा मालकी हक्क मिळावा, याकरिता औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शासकीय जागेवर वास्तव्य करीत असलेल्या भूमिहीन शेतमजूर, दलित, आदिवासी कुटुंबांना त्यांच्या घराचा मालकी हक्क मिळावा, याकरिता औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढल्या आहेत.अहमदनगर येथील श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोपडा यांनी अ‍ॅड. नितीन गवारे पाटील यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए.एम. बदर यांच्यासमोर याचिकेची सुनावणी झाली असता याचिकाकर्त्यांनी न्यायालयात नमूद केले की, १९७२ च्या केंद्र शासनाच्या २० कलमी कार्यक्रमांतर्गत भूमिहीन शेतमजूर, दलित, आदिवासी यांना राहत्या घरासाठी शासकीय जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. त्याचवेळी त्यांना मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात झाला होता. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे हे रहिवासी आजही शासनाच्या लेखी अतिक्रमणधारक आहेत. ४ एप्रिल २००२ च्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी १९९५ पर्यंत मुंबई, उपनगर जिल्हा वगळून राज्यातील उर्वरित जिल्ह्यातील झोपडपट्टींना संरक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे निवासी प्रयोजनासाठी ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, सरपंच, नगररचनाकार यांची समिती स्थापन करण्यास सांगितले. समितीने ले-आऊट केलेला आराखडा मंजूर करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना तर शहरी भागात मनपा आयुक्तांना देण्यात आले. त्यामुळे हजारो झोपडपट्टीधारक मालकी हक्काच्या उताऱ्यापासून वंचित आहेत. मूलभूत सोयी-सुविधा त्यांना मिळत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. शासन निर्णयाच्या आधारे कुटुंबांना मालकी हक्क देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने प्रतिवादी महाराष्ट्र शासन आणि अन्य सात जणांना नोटिसा काढून याचिकेची सुनावणी ८ जानेवारी रोजी ठेवली आहे.