अहमदपूर : तालुक्यातील मोरेवाडी शिवारात टिप्परचालक व बस चालकामध्ये ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून बसचालकास मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली़ याप्रकरणी टिप्पर चालकाविरूद्ध अहमदपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे़ मोरेवाडी शिवारात बसचालक गोकुळ गुरमे बस क्रमांक एमएच १४, १३६५ अहमदपूर ते उदगीर या मार्गावर प्रवासी घेऊन जात असताना टिप्पर क्रमांक एमएच ०४, जीसी ४८१५ या टिप्परला ओव्हरटेक करून बस पुढे जात असताना बसचालक मोरेवाडी पाटीवर बस थांबून प्रवासी उतरत असताना अन्य दोघांनी मिळून बसचालकास बाहेर ओढून मारहाण केली़ तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केला म्हणून बसचालक गुरमे यांच्या फिर्यादीवरून कलम ३५३, ३५२, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे टिप्परचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर करीत आहेत़ (प्रतिनिधी)
ओव्हरटेक केल्यामुळे बसचालकास मारहाण
By admin | Updated: November 26, 2014 01:09 IST