शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बहिरट यांनी काढले लाखोंचे उत्पन्न

By admin | Updated: July 1, 2014 01:06 IST

पांडुरंग खराबे , मंठा तालुक्यातील आर्डा (खारी) येथील अल्पभूधारक शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेऊन कमी खर्चात लाखो रुपये उत्पादन काढून कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण केला.

पांडुरंग खराबे , मंठातालुक्यातील आर्डा (खारी) येथील अल्पभूधारक शेतीमध्ये टरबूज, काकडी, सिमला मिरची, डाळिंब, द्राक्ष, पपई, सोयाबीन, मका, पेरू अशी विविध प्रकारचे उत्पादन घेऊन कमी खर्चात लाखो रुपये उत्पादन काढून कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण केला. त्यांच्या शेतीमधील पिकाची पाहणी व माहिती घेण्यासाठी दूरवरून शेतकरी येत आहेत. तर ते स्वत:च गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना उत्पादनवाढीचे धडे देत आहेत.यावर्षी उन्हाळ्यात विठ्ठलराव बहीर यांनी २० गुंठे शुगरक्वीन शींजरा जातीचे टरबूज लावून सुमारे ७० दिवसात एक लाख पन्नास हजाराचे उत्पादन मिळविले. त्यासाठी त्यांनी केवळ ४५ हजार रुपये खर्च केला होता. निव्वळ नफा १ लाख ५ हजार रुपये झाला. तर २० गुंठे शेतीमध्ये जून २०१३ ला सिमला मिरचीची लागवड केली. त्यासाठी त्यांना २ लाख पन्नास हजार खर्च आला. आणि उत्पादन ७ लाख पन्नास हजार रुपयाचे आले. निव्वळ नफा ५ लाख रुपये राहिला. सप्टे. २०१३ मध्ये २० गुंठ्यामध्ये तायवान जातीच्या पपईची लागवड केली. आतापर्यंत ५ टन उत्पन्न निघाले आणखी ५ टन निघेल. रमजानमुळे भाव बरा मिळणार, यात शंका नसल्याचे ते म्हणाले. पपईमधून ८५ हजाराचे उत्पादन तर २५ हजार खर्च झाला. त्याचप्रमाणे १ एकरमध्ये नोव्हे. २०१३ मध्ये भगवा जातीच्या डाळींबाची लागवड केली असून २५ हजार रुपये खर्च आला. उत्पादन येणे बाकी आहे. त्याचप्रमाणे त्यांनी लाखनो जातीचा पेरू लावला २०१३ पासून उत्पादन सुरू झाले. उत्पादन ४० हजार तर खर्च केवळ १२ हजार झाल्याचे प्रगत शेतकरी विठ्ठलराव बहिरट यांनी सांगितले.यावर्षी १० गुंठे जमिनीत जानेवारी महिन्यात काकडीची लागवड केली. त्यामधून ४५ दिवसात १० हजार रुपयाचे उत्पादन झाले तर केवळ त्यासाठी २ हजार रुपये खर्च आला. आता एक एकरामध्ये आधुनिक पद्धतीने द्राक्ष लागवड केली असून, यामधून मोठे उत्पादन मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शेतीच्या कामासाठी आणि उत्पादन वाढीसाठी त्यांचे अख्खे कुटुंब शेतात राबताना दिसते. त्यामध्ये पत्नी रुख्मीनीबाई, मुलगा शेषनारायण बहिरट, सतीश बहिरट, रामू बहिरट, सुना, नातवंडे सर्वांनाच शेती कामात रस आहे, हे विशेष.कृषी विभागाकडून नियमित मार्गदर्शनया प्रगत शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाहणीसाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त दांगट, उपविभागीय कृषी अधिकारी पी.एस. बरदाळे, आ. सुरेशकुमार जेथलिया, तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, कृषी पुरस्कारप्राप्त उद्धवराव खेडेकर, प्रतिष्ठित व्यापारी रामेश्वर खराबे, कृउबा समितीचे संचालक काशिनाथराव बोराडे, पिन्टू भाबटसह अनेक शेतकऱ्यांनी भेट देवून शेतीची पाहणी केली.