शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

तीन प्राध्यापक परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ

By admin | Updated: July 23, 2014 00:41 IST

औरंगाबाद : ज्या केंद्रावर पत्नीने परीक्षा दिली, तेथे केंद्र संचालक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकासह तिघा जणांना परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ करण्याचा निर्णय विद्यापीठ परीक्षा मंडळाने घेतला आहे.

औरंगाबाद : ज्या केंद्रावर पत्नीने परीक्षा दिली, तेथे केंद्र संचालक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकासह तिघा जणांना परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा मंडळाने घेतला आहे. आज मंगळवारी परीक्षा मंडळाची बैठक होती. या बैठकीत परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या तीन प्राध्यापकांना बडतर्फ करण्याचा ठराव चर्चेला आला. यात शिरसाळा, जिल्हा बीड येथील पंडित गुरू पार्डीकर कला महाविद्यालयातील एम.बी. धोंडगे हे मराठीचे प्राध्यापक आहेत. त्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात प्रा. धोंडगे यांच्या पत्नीने परीक्षा दिली. त्यावेळी त्यांनी परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून काम पाहिले. त्यामुळे प्रा. धोंडगे यांना परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ करण्यात आले. एका प्राध्यापकाने बीसीएसचे पेपर तपासताना जास्तीचे गुणदान केल्याचे निष्पन्न झाले. या तीन प्राध्यापकांवर ठपका ठेवून त्यांना परीक्षा प्रक्रियेतून बडतर्फ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.याशिवाय विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाचे मानकरी ठरवण्यासाठी डॉ. वाल्मीक सरवदे व डॉ. विलास खंदारे या दोन प्राध्यापकांची समिती स्थापन करण्यात आली.सध्या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी श्रेणी पद्धत (ग्रेडिंग), तर महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गुणदान पद्धत अवलंबली जात आहे. मात्र, विद्यापीठातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सुवर्णपदकाचा मानकरी ठरवण्यासाठी सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. ‘पीईएस’ अभियांत्रिकीबाबत ठराव पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘कॅस सेंटर’ काढून घेण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला असून, संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नोटीस बजावली आहे. आजच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा ठराव चर्चेला आला तेव्हा त्या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.