शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तीन कंपन्यांचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश

By admin | Updated: May 17, 2016 00:33 IST

वाळूज महानगर : प्रदूषण वाढविणाऱ्या व सांडपाण्यावर सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया न करणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरातील तीन कंपन्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश

वाळूज महानगर : प्रदूषण वाढविणाऱ्या व सांडपाण्यावर सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया न करणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरातील तीन कंपन्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले आहेत. निर्धारित मुदतीत प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न राबविल्यास या कंपन्यांचे उत्पादन कायमस्वरूपी बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.अनेक कंपन्या चोरी-छुपे एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर घातक रसायनांची विल्हेवाट लावत असल्याचे वृत्त लोकमतने गत महिन्यात प्रकाशित केले होते. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, क्षेत्र अधिकारी स्नेहल कोचे, कल्याणी झाडपिडे आदींच्या पथकाने १८ एप्रिल व ७ मे रोजी ठिकठिकाणी पाहणी केली. या पाहणीत सांडपाण्याचे नमुने तपासणी घेऊन दोषी कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याची तंबी कारखानदारांना देण्यात आली. पथकाने ७ मे रोजी वाळूज एमआयडीसीतील पूजा इंजिनिअरिंग (प्लॉट नंबर एफ-७५), धनलक्ष्मी इंटरप्रायजेस (प्लॉट नंबर-एफ-७५) व सार इंडस्ट्रीज (प्लॉट क्रमांक- एम.-१९) येथे पाहणी केली. या कंपन्यांत प्रदूषण रोखण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून आले. घातक रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात होते. (पान २ वर)अहवालानंतर उर्वरित कंपन्यांवर कारवाई१८ एप्रिल रोजी मंडळाने केलेल्या पाहणीत कृष्णा इंडस्ट्रीज (प्लॉट नंबर एम.१०८/१३) या कारखान्यातील सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचे दिसून आले होते. ठिकठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच संबंधित कारखान्यावरही पाणी व वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.