बुटाच्या चोरीची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भीती ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 16:45 IST2020-01-28T16:43:16+5:302020-01-28T16:45:20+5:30
चोरीला जाण्याच्या भीतीमुळेच त्यांनी बूट हातात उचलून घेतल्याची चर्चा ऐकायला मिळाली.

बुटाच्या चोरीची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भीती ?
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातील उपोषणस्थळी स्वत:चे बूट हातात उचलून घेतल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली. चोरीला जाण्याच्या भीतीमुळेच त्यांनी बूट हातात उचलून घेतल्याची चर्चा ऐकायला मिळाली.
पंकजा मुंडे यांचे उपोषण विभागीय आयुक्तालय परिसरात होते. त्याठिकाणी १२ वाजता दाखल झालेले देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केल्यानंतर तेथून निघताना स्वत:चे बूट हातात घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वांचे कॅमेरे त्यांच्या हातातील बुटांकडे वळले. भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी नमस्कार करीत असतानाही त्यांनी एका हातानेच उपस्थितांना नमस्कार केला. एका हातात मात्र त्यांचे बूट होते. याविषयी दिवसभर चर्चा करण्यात येत होती, तसेच हे छायाचित्र सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ झाले.