शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अधिकाऱ्यांच्या पाहणीत मिळतात फक्त सूचना, आश्वासने

By admin | Updated: June 25, 2014 01:26 IST

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी येणार असल्याची माहिती मिळताच मॉडेल रेल्वेस्थानक आणि परिसर चकाचक होतो.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी येणार असल्याची माहिती मिळताच मॉडेल रेल्वेस्थानक आणि परिसर चकाचक होतो. अधिकारी येतात, पाहणी करतात. स्थानकावरील अधिकाऱ्यांना विविध सूचना देतात आणि विविध सोयी-सुविधा पुरविण्याबाबत प्रयत्न सुरू आहे, प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, लवकरच प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती देऊन निघून जात असल्याची स्थिती गेल्या दोन महिन्यांत दिसून आली. अशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात केवळ सूचना, आश्वासने मिळत असताना स्थानिक अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ होताना दिसून आली.रेल्वे अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात कॅन्टीन, वेटिंग रूम, स्वच्छतागृह, तिकीट सेक्शन, आरक्षण कार्यालय, सीसीटीव्ही रूम, मालधक्का परिसराची पाहणी क रण्यात आली. रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीत अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, मेटल डिटेक्टर बंद आहेत, मालधक्क्याची जागा अपुरी पडत आहे, अनेक वर्षे रखडत, रखडत पूर्ण झालेल्या लिफ्टच्या सुविधेत लिफ्टमनअभावी अडचणी येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते; परंतु या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक होईल, यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याचे दिसते. या प्रश्नांची लवकरच सोडवणूक होईल, निधीची अडचण आहे, अशीच काहीशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते. फक्त चकाचक प्लॅटफॉर्म, परिसरासह प्लॅटफॉर्मवर कधीही न दिसणारी शोभिवंत झाडे अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान दिसून येतात.पाहणी करण्यावरच भर९ जून रोजी दक्षिण मध्य रेल्वे एडीआरएम पी.बी. निनावे यांनी रेल्वेस्थानकावरील कॅन्टीससह सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच सुरू होणार असून, १४.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेले हे काम इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (आयटीडीसी) सहकार्याने केले जाणार असल्याची माहिती दिली.७ मे, १८ जून, २२ जून रोजी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा यांनी विविध सोयी-सुविधा, स्वच्छतेची पाहणी केली.अनेक प्रस्ताव रखडलेनव्या इमारतीत, आरक्षण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे. तपासणीच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून केवळ देवदर्शन केले जाते. सिकंदराबाद मुख्यालयात अनेक प्रस्ताव पडून आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत अशा अनेक बाबींचा उलगडा झाल्याचे मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी म्हटले.रेल्वे गाड्यांची प्रतीक्षाघोषित केलेल्या रेल्वेगाड्या कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करावी लागत आहे. अधिकाऱ्यांकडून केली जाणारी पाहणी ही आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, असे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी म्हटले.अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा२० एप्रिल- दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी.के. श्रीवास्तव यांचे विंडो ट्रॅक इन्स्पेक्शन.७ मे- नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा.५ जून- दक्षिण मध्य रेल्वेचे एडीआरएम पी.बी. निनावे.९ जून- दक्षिण मध्य रेल्वेचे एडीआरएम पी.बी. निनावे.१८ जून- नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा.२२ जून- नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा.