शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगिता प्रमाणपत्राचे केवळ पाच प्रस्ताव

By admin | Updated: December 20, 2015 23:34 IST

हिंगोली : आदिवासी विद्यावेतन योजनेतंर्गत २००९ ते ११ या शैक्षणिक वर्षांतील लाभ घेतलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे उपयोगिता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव अद्याप दाखल करण्यात आले नाहीत.

हिंगोली : आदिवासी विद्यावेतन योजनेतंर्गत २००९ ते ११ या शैक्षणिक वर्षांतील लाभ घेतलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे उपयोगिता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव अद्याप माध्यमिक शिक्षण विभागाकडे दाखल करण्यात आले नाहीत. याबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना १ डिसेंबर रोजी कळविण्यात आले होते. सदर प्रस्तावाची प्रक्रिया आठ दिवसांत होणे अपेक्षित असल्याचे शिष्यवृत्ती विभागाकडून सांगण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्या अनुषंगाने शासनस्तरावर सुरू असलेल्या शिक्षण संचलनालय शिष्यवृत्ती विभाग, पुणे यांच्यामार्फत अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विद्यावेतन योजना राबविली जाते. योजनेतंर्गत पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ४० रूपये तर इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ५० रूपये प्रमाणे विद्यावेतन दिल्या जाते. जिल्ह्यातील जि. प. च्या शाळांसह अनुदानित ९२ तर विनाअनुदानित ३३ शाळांतून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. परंतु विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभ व योजनेची प्रक्रिया पूर्ण झाली किंवा नाही, याबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रयोगिता प्रमाणपत्राचा अहवाल जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्राप्त झालेले प्रस्ताव पुणे येथील शिष्यवृत्ती विभागाकडे वर्ग करणे बंधनकारक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना किती प्रमाणात योजनेचा लाभ मिळाला याची खातरजमा केल्या जाते. परंतु याबाबत शाळांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून तसेच माहिती सांगूनही केवळ पाच अहवाल जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे याकडे संबधित गटशिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सेनगाव तालुक्यातील जवळपास १०० विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर हिंगोली तालुक्यातील ९० तर कळमनुरी येथील १३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)