जिल्ह्यात फक्त ४.५४ मि.मी.पाऊस

By Admin | Updated: June 14, 2016 00:08 IST2016-06-13T23:55:11+5:302016-06-14T00:08:24+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात जोरदार पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा असून, गेल्या आठवड्यात फक्त मान्सूनच्या आगमनाची तारीख होती.

Only 4.54 mm water in the district | जिल्ह्यात फक्त ४.५४ मि.मी.पाऊस

जिल्ह्यात फक्त ४.५४ मि.मी.पाऊस


औरंगाबाद : जिल्ह्यात जोरदार पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा असून, गेल्या आठवड्यात फक्त मान्सूनच्या आगमनाची तारीख होती. तेव्हापासून आजवर जिल्ह्यात फक्त ४.५४ मि. मी. पाऊस झाला असून, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ७ ते १२ जूनदरम्यान झालेल्या पावसाची ही सर्वाधिक कमी नोंद आहे.
गेल्या वर्षी १२ जूनपर्यंत ३७.२६ मि. मी. पावसाची नोंद झाली होती. तर १२ जून २०१५ या दिवशी २७.२९ मि. मी. पाऊस जिल्ह्यात पडला होता. या आकडेवारीच्या तुलनेत यंदा मान्सून लागल्यापासून आजवर दमदार पाऊस न झाल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. दमदार पावसाच्या आगमनानंतरच ही चिंता दूर होईल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७० टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला होता. फुलंब्री तालुक्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस झाला होता.

Web Title: Only 4.54 mm water in the district