शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

मराठवाड्यातील प्रकल्पांत फक्त ०.२३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 14:31 IST

 जायकवाडीतही कमी जलसाठा

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा  मान्सून सुरू होऊन ३७ दिवस झाले आहेत.

औरंगाबाद : मान्सून सुरू होऊन ३७ दिवस झाले आहेत. मात्र, या ३७ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यामुळे मराठवाड्यातील एकाही मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा होऊ शकलेला नाही. जायकवाडीचा मृतसाठादेखील अजून जिवंतसाठ्यात आलेला नाही. ११ मोठ्यांसह सर्व प्रकल्पांत ३७ दिवसांत ०.२३ टक्के पाणी आलेले आहे. गेल्या आठवड्यात सर्व प्रकल्पांत ०.४५ इतका जलसाठा जूनअखेरीस होता. तो आता ०.६८ टक्के झाला आहे. 

विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. १२ दलघमी इतका उपयुक्त जलसाठा त्या प्रकल्पांत आहे. ७५ मोठ्या प्रकल्पांत २१.७४ दलघमी तर ७४९ लघुप्रकल्पांत २१.७२६ दलघमी साठा आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ११ मोठ्या प्रकल्पांच्या क्षेत्रात पावसाने अपेक्षित अशी हजेरी लावली नाही. परिणामी विभागातील धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला नाही. मध्यम प्रकल्प क्षेत्रातही पावसाने दडी मारली आहे. लघुप्रकल्प हद्दीत काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु त्याचा साठा वाढण्यावर परिणाम झालेला नाही. यामुळे काळजी वाढली आहे.पाच वर्षांतील जायकवाडीची स्थिती 

मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा जायकवाडीतील पाणीपातळी खालावली आहे. २०१४ मध्ये ७० दलघमी, २०१५ मध्ये २८ दलघमी, २०१६ मध्ये धरण मृतसाठ्यात होते. २०१७ मध्ये ३९० दलघमी पाणी होते तर २०१८ मध्ये ४३९ दलघमी पाणी जायकवाडीत होते. यावर्षी धरण मृतसाठ्यात आहे. गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहिले, मात्र त्याचा फार मोठा फायदा जायकवाडी क्षेत्राला झालेला नाही. 

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळRainपाऊस