मराठवाड्यातील प्रकल्पांत फक्त ०.२३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 02:26 PM2019-07-13T14:26:22+5:302019-07-13T14:31:38+5:30

 जायकवाडीतही कमी जलसाठा

Only 0.23 percent of water in Marathwada projects | मराठवाड्यातील प्रकल्पांत फक्त ०.२३ टक्के पाणी

मराठवाड्यातील प्रकल्पांत फक्त ०.२३ टक्के पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा  मान्सून सुरू होऊन ३७ दिवस झाले आहेत.

औरंगाबाद : मान्सून सुरू होऊन ३७ दिवस झाले आहेत. मात्र, या ३७ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यामुळे मराठवाड्यातील एकाही मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा होऊ शकलेला नाही. जायकवाडीचा मृतसाठादेखील अजून जिवंतसाठ्यात आलेला नाही. ११ मोठ्यांसह सर्व प्रकल्पांत ३७ दिवसांत ०.२३ टक्के पाणी आलेले आहे. गेल्या आठवड्यात सर्व प्रकल्पांत ०.४५ इतका जलसाठा जूनअखेरीस होता. तो आता ०.६८ टक्के झाला आहे. 

विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. १२ दलघमी इतका उपयुक्त जलसाठा त्या प्रकल्पांत आहे. ७५ मोठ्या प्रकल्पांत २१.७४ दलघमी तर ७४९ लघुप्रकल्पांत २१.७२६ दलघमी साठा आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ११ मोठ्या प्रकल्पांच्या क्षेत्रात पावसाने अपेक्षित अशी हजेरी लावली नाही. परिणामी विभागातील धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला नाही. मध्यम प्रकल्प क्षेत्रातही पावसाने दडी मारली आहे. लघुप्रकल्प हद्दीत काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु त्याचा साठा वाढण्यावर परिणाम झालेला नाही. यामुळे काळजी वाढली आहे.
पाच वर्षांतील जायकवाडीची स्थिती 

मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा जायकवाडीतील पाणीपातळी खालावली आहे. २०१४ मध्ये ७० दलघमी, २०१५ मध्ये २८ दलघमी, २०१६ मध्ये धरण मृतसाठ्यात होते. २०१७ मध्ये ३९० दलघमी पाणी होते तर २०१८ मध्ये ४३९ दलघमी पाणी जायकवाडीत होते. यावर्षी धरण मृतसाठ्यात आहे. गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहिले, मात्र त्याचा फार मोठा फायदा जायकवाडी क्षेत्राला झालेला नाही. 

Web Title: Only 0.23 percent of water in Marathwada projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.